Friday, May 3, 2024
Homeनगरबेकायदेशीररीत्या तलवार बाळगणार्‍या एकाला अटक

बेकायदेशीररीत्या तलवार बाळगणार्‍या एकाला अटक

अहमदनगर|Ahmedagar

बेकायदेशीररीत्या तलवार बाळगणार्‍या एकाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

प्रवीण रमेश कांबळे (वय 32 रा. बोरूडे मळा, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडील तलवार पोलिसांनी जप्त केली असून त्याच्याविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रेमदार चौकातील हॉटेल न्यु पंचरत्न समोर चायनिजच्या टपरीजवळ एक इसम तलवार घेऊन उभा असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने चायनिजच्या टपरीजवळ जाऊन खात्री केली असता प्रवीण कांबळे याच्याकडे तलवार आढळून आली. पोलिसांनी तलवार जप्त करत कांबळे विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या