Saturday, May 18, 2024
Homeनाशिकविनयभंग प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत एकाला अटक

विनयभंग प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत एकाला अटक

नाशिक | वार्ताहर | Nashik

इंदिरानगर (Indiranagar) परिसरातील राणेनगर येथील शाळेच्या मैदानावर पीडितेस अडवून विनयभंग (molestation) केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी छेड काढणाऱ्या विरोधात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार संशयित शुभम ताकतोडे (Shubham Taktode) (रा. उपेंद्र नगर) याने दि.16 रोजी  दुपारी राणेनगर येथील शाळेच्या मैदानावर पीडितेस अडवून तू माझ्यासोबत फिरायला आली नाही तर तुझ्याकडे बघतो अशी धमकी दिली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्यामुळे पीडिता भयभीत झाली होती ती शाळेत, वर्गात न जाता समाजमंदिरात गेली. घाबरलेल्या पीडितेने शाळा सुटल्यानंतर घरी गेल्यावर पालकांनी विचारल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संशयित शुभम हा सदरील पीडितेचा वारंवार पाठलाग करून त्रास देत असल्याने पालकांनी शुभमला समजावण्याचा प्रयत्न केला होता.

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्यात

परंतु उलट शुभमनेच पालकांनाही शिवीगाळ करीत धमकावले होते. यासंदर्भात पीडितेच्या आईने इंदिरानगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शुभम विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शुभम ला अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या