Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्याAccident News : सिमेंट मिक्सर ट्रकची चार वाहनांना धडक; एकाचा मृत्यू, तीन...

Accident News : सिमेंट मिक्सर ट्रकची चार वाहनांना धडक; एकाचा मृत्यू, तीन गंभीर

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुंबईत सिमेंट मिक्सर ट्रकने (RCC Mixer Truck) चार वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात (A Terrible Accident) घडला आहे. या अपघातात वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला असून एकाचा मृत्यू (Death) तर तीन जण गंभीर जखमी झाल्याचे समजते…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट मिक्सर ट्रक बीकेसी उड्डाणाजवळून कुर्ल्याकडे जात होता. त्यावेळी भरधाव वेगात असणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने दोन ऍक्टिव्हा, एक मोटार सायकल आणि एक पीयुसी व्हॅनला धडक दिली. यावेळी अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. तसेच जखमींना (Injured) जवळच्या सायन रुग्णालयात (Sion Hospital) दाखल करण्यात आले आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी कालवश

दरम्यान, या अपघातानंतर मिक्सर ट्रक चालक घटनास्थळाहुन फरार झाला असून घटनेची माहिती मिळताच चुनाभट्टी पोलीस (Chunabhatti Police) घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. तसेच याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या