नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad
नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको कॉलेज येथील गुरुद्वाराजवळ रस्ता ओलांडत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने एकास उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
- Advertisement -
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेश दयाभाई पटेल (४३, रा. गंधर्वनगरी, नाशिकरोड) हे बिटको कॉलेज येथील गुरुद्वाराजवळून रस्ता ओलांडत होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.