नागपूर | Nagpur
राज्यात सध्या 29 महानगर पालिकांच्या निवडणुकांसाठी प्रचार सुरु आहे. यासाठी राज्यातील सर्वच बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुध्दा प्रचारात जोमाने उतरले आहे. तसेच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, मनसे आणि इतर पक्षांचे नेतेही प्रचारात व्यस्त आहेत. निवडणुकीच्या या रणधुमाळीत राज्यात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांबाबत एक मोठे विधान केले आहे.
नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत, जेष्ठ नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे म्हणत नाना पटोले यांनी नाव न घेता भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना चिमटा काढला. तसेच, विधानसभा अध्यक्षांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणलेल्या दबावरुन त्यांना बदलण्याची मागणीही पटोले यांनी केली. विधिमंडळाची परंपरा आहे, लोकांना न्याय मिळेल, विरोधकांना न्याय मिळेल ही भूमिका असली पाहिजे. राजकारणी म्हणून त्यांना वावरता येत नाही, त्यामुळे भाजपचे त्यांना बदलावे, असेही नाना पटोले यांनी म्हटले. तर, निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, असे म्हणत निवडणूक आयोगावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्र्याविरोधात भाजपचा एक गट सक्रिय
यासोबतच, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी भाजपचा एक गट सक्रिय झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या सक्रिय गटाबाबत देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे असेही पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच आगामी काळात राज्याच्या राजकारणात काय घडणार याची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
भाषण सुरु असतानाच नारायण राणेंची तब्येत बिघडली; आवाज बसला, चक्कर आली…
महायुतीचे सरकार आले त्यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळाले नव्हते त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याचाच धागा पकडत नाना पटोले यांनी म्हटले की, सुधीर मुनगंटीवारांचे जे चालले आहे ते फडणवीसांनाही माहिती आहे. त्यामुळे कुठं-कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहिम, त्यांना पदावरून हटवण्यासाठी भाजपचा एक गट सक्रीय झाला आहे, त्या सक्रिय गटामध्ये काय काय चालले आहे ते मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे. भाजपमध्ये पुढच्या काळात सत्ता संघर्षाचा स्फोट होईल हे आपल्याला पहायला मिळणार आहे.
नवनीत राणांच्या वक्तव्यावर ओवेसींचं प्रत्यूत्तर, म्हणाले, “तुम्ही चार नाही तर…”
निवडणुकीच्या तोंडावर केलेली घोषणा
शेतकऱ्यांच्या कर्जावरील स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या निर्णयावरूनही नाना पटोले यांनी टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही घोषणा आहे, ही कर्ज घेण्याची वेळ नाही, आधी घोषणा केली असती तर फायदा झाला असता, महसूलमंत्री मुनगंटीवार यांचे काय सुरू आहे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे.
पुढे बोलताना भाजपवर टीका करताना पटोले म्हणाले की, ‘भाजपवाले मानसिक आजारी आहेत, सत्तेचा माज आहे. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल मोठा रोष आहे, याचा उद्रेक होईल. लोकांचे मत घेण्यासाठी हिंदू, मुस्लिम, मराठी, हिंदी या विषयांवर राजकारण सुरू आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे.




