Friday, May 3, 2024
Homeनाशिकपाण्याच्या टाकीला धडकून दुचाकीस्वार ठार

पाण्याच्या टाकीला धडकून दुचाकीस्वार ठार

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील सांगवी शिवारात वडांगळी-उजणी रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीला (water tank) दुचाकी धडकून दुचाकीचालक ठार (Killed) झाल्याची घटना शनिवारी (दि.26) रात्री घडली असून सकाळी दूध घषऊन जाणार्‍या शेतकर्‍यामूळे (farmers) ही बाब लक्षात आली. या अपघातात (accidents) एक जण गंभीर जखमी झाला आहे.

- Advertisement -

वडांगळी-उजनी रस्त्यालगत केशव घुमरे यांच्या शेतात असलेल्या सिमेंटच्या टाकीला एम. एच. 15/ जि. पी. 0180 ही दुचाकी धडकलेल्या अवस्थेत सकाळच्या सुमारास रस्त्यावरून दुध घेऊन जाणार्‍या शेतकर्‍यांना दिसुन आली. दुचाकी जवळ दोन अनोळखी युवक पडलेले असल्याचे आढळले. दोघांपैकी एक युवकाचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर दुसरा तरुण गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. स्थानिकांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) माहिती देत पांगरी (pangri) येथील शांताराम वारुळे यांच्या रुग्णवाहिकेला (ambulance) पाचारण केले.

दोघा अपघातग्रस्त तरुणांना सिन्नर (sinnar) येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, निलेश सुधाकर आवारे (34) रा. वाकद -शिरवाडे ता. निफाड याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर सुनिल दौलत वाणी (38) रा. अंबड (नाशिक) यास उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. दवाखान्यात आणल्यावर खिशातील ओळख पत्रावरून दोघांची ओळख पटली. यावेळी मोबाईल फोनवर येणार्‍या कॉलवर दोघांच्याही घरच्यांना अपघाताची माहिती देण्यात आली. मयत निलेश यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

तरुणाच्या मृत्यूने यात्रा बंद

तरुणाच्या मृत्यूची बातमी शिरवाडे गावात कळताच नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद ठेवली. त्याचबरोबर येथील पिरसाई बाबा यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णयही ग्रामस्थांनी घेतल्याचे आमच्या शिरवाडेच्या वार्ताहराने कळवले आहे.. यात्रोत्सवानिमित्त आयोजित तमाशा व कुस्त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे यात्रा कमेटीने घोषित केले. निलेश हा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या चुलत बहिणीचा मुलगा असून शिरवाडे येथील प्रगतशील शेतकरी होता. दुग्ध व्यवसायातून त्याने अल्पावधीतच मोठी भरारी घेतली होती. अत्यंत मनमिळाऊ व सामाजिक कामात अग्रेसर म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या