येवला । प्रतिनिधी Yeola
नाशिक – श्री छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील देशमाने येथे ट्रॅव्हल्स स्लीपर कोच गाडी व ट्रकचा समोरासमोर झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्स बसचा चालकाचा मृत्यू झाला. तर बस मधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत.
जालना जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते. परतीच्या प्रवासा दरम्यान, नाशिक -श्री छत्रपती संभाजीनगर महामार्गावर तालुक्यातील देशमाने येथे पुलावर ट्रॅव्हल्स स्लीपर कोच गाडी व ट्रक (क्रमांक MH 43 U 3232) यांची समोरा समोर धडक होवून अपघात झाला. सदर घटना, सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातानंतर ट्रॅव्हल्सची बस शेजारील शेतामध्ये गेली.
या अपघातात ट्रॅव्हल्स बसचा चालक जगदीश जाट चौधरी(वय 32) रा. राजस्थान गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अपघातात बस मधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातातील जखमींची नावे
भगत भोसले (वय 47) रा. परभणी, शांताबाई पाचरणे (वय 60) रा. पानशेद्र, माधव गाडे (वय 20) रा. पानशेद्र, रावसाहेब पाचरणे (वय 60) रा. पानशेद्रा, जनाबाई दत्तात्रय पवार (वय 32) रा. परभणी, चंद्रकला पाचरणे (वय 45) रा. पानशेद्रा, विष्णू दादाराम पाचरणे (वय 50) रा. पानशेद्रा, मंगलबाई सुस्ते (वय 50) रा. आडगाव, संभाजीनगर, सुमनबाई पाचरणे (वय 50) रा. पानशेद्रा, दत्तात्रय आप्पा पवार (वय 37) रा. परभणी, निर्मलाबाई पाचारणे (वय 60) रा. पानशेद्रा, महानंदाबाई रोडगे (वय 50) रा. मंगळुळ. जखमींना येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी येवला तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.