Sunday, April 27, 2025
HomeनाशिकNashik Crime News : देवळा तालुक्यात वादातून एकाची हत्या

Nashik Crime News : देवळा तालुक्यात वादातून एकाची हत्या

संशयित आरोपी ताब्यात

- Advertisement -

देवळा | Deola

तालुक्यातील मटाणे येथे वादातून एकाचा खून झाल्याची घटना घडली असून पोलीसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मटाणे येथील कांदा व्यवसाय करणारे दिपक निंबा साबळे (वय ४५) व रंगकाम करणारा संतोष पवार उर्फ ज्वाल्या दुपारी ४ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये काही कारणावरून झालेल्या वादातून संतोष पवार याने धारदार शस्त्र दिपक साबळे याच्या छातीत खूपसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी संतोष पवार यास अटक केली असून याबाबत मयताची बहीण अजनाबाई निक्षे यांनी देवळा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उपनिरीक्षक दामोदर काळे, दिपक पाटील व सहकारी पुढील तपास करीत आहे.

घटनेनंतर मयताचे नातेवाईकांनी आक्रोश करत देवळा पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी काही काळ रस्त्यावर ठाण मांडले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : महिला प्रवाशाची पर्स चोरट्याने केली लंपास, पोलिसांत तक्रार...

0
शिरूर । तालुका प्रतिनिधी शिरूर परिसरात एका प्रवाशाची पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीत १६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८८ हजार रुपये...