Wednesday, June 19, 2024
Homeमहाराष्ट्रAccident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; जंगली प्राणी आडवा आल्याने भरधाव...

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; जंगली प्राणी आडवा आल्याने भरधाव कार उलटली

मुंबई | Mumbai

- Advertisement -

समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) सुरु झाल्यापासून त्याच्यावर दर आठवड्यात किंवा महिन्याला अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागत असून प्रशासनाने अनेक उपाययोजना करुनही अपघात (Accident) थांबत नाही. अशातच आता पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यातून (Washim District) गेलेल्या समृद्धी महामार्गावर कारचा वन्यप्राण्याला धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीकडे (Pune to Amravati) जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावरील वनोजा कारंजा दरम्यान लोकेशन १९६ जवळ कारला अचानक जंगली प्राणी (Wild Animals) आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात कारने तीन पलट्या घेतल्या. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

ICC ची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग रॅकेटचा पर्दाफाश; ३ भारतीयांसह ८ जण जाळ्यात

तसेच एका महिलेचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू (Death) झाला आहे. सुनंदा अनुज दुरतकर असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अनुज दुरतकर (वय ६५), पंकज अनुज दुरतकर (वय ३५) भावना पंकज दुरतकर (वय ३०) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळतात कार्ड लोकेशन समृद्धी महामार्ग पायलट घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना (injured) पुढील उपचारासाठी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या