Wednesday, July 24, 2024
HomeनाशिकNashik Crime News : नाशिकरोडला दोन गटांत वाद होऊन गोळीबार; एक जण...

Nashik Crime News : नाशिकरोडला दोन गटांत वाद होऊन गोळीबार; एक जण जखमी

नाशिक | Nashik

- Advertisement -

नाशिकरोड (Nashik Road) येथील चाडेगाव येथे देवी यात्रा निमित्ताने आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत मागील वर्षीच्या गंगाजळी रक्कमेच्या हिशोबावरून दोन गटांत वाद होऊन गोळीबार (Firing) झाल्याची घटना बुधवारी (दि.२४) रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बैठक सुरु असताना मागील वर्षीच्या गंगाजळी रक्कमेच्या हिशोबावरून दोन गटात वाद झाला. त्यानंतर यातील एका गटाकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेत चार राऊंड फायर झाले असून बंडू मानकर नामक व्यक्ती गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिकरोड येथील एका खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत.

सविस्तर बातमी लवकरच

- Advertisment -

ताज्या बातम्या