Tuesday, May 28, 2024
Homeनगरचांडगावला पुराच्या पाण्यात एकजण वाहून गेला

चांडगावला पुराच्या पाण्यात एकजण वाहून गेला

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव या ठिकाणी रात्री झालेल्या पावसामुळे ओढ्याला पूर आल्याने एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. अनेक तासापासून महसूल विभागाच्या पथकाकडून शोधकार्य सुरू असून अद्यापही त्या व्यक्तीचा शोध लागला नाही शोभाचंद गणपत घोडके (52, रा. चांडगाव, ता. श्रीगोंदा) असे वाहुन गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.25) मध्यरात्री श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कोकणगाव, हिरडगाव, चांडगाव, टाकळी, कडेवळीत परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. युमळे या परिसरातील नाले, ओढ्यांना पूर आला होता. चांडगाव येथील शोभाचंद घोडके हे येथील रानातून नेहमीप्रमाणे गावात येत असताना पुलावरून पाणी वाहत होते. असे असतानाही ते पाण्यातून गावाकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले.

मात्र पाण्याचा प्रवाह गतिमान असल्यामुळे पाण्याचा अंदाज आला नाही आणि शोभाचंद घोडके हे ओढ्याच्या प्रवाहात वाहून गेले. ही माहिती प्रशासनाला कळविण्यात आली ग्रामस्थांच्या सहकार्‍यांनी पथकाने सकाळपासून शोधकार्य सुरु केले. मात्र अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या