Tuesday, May 21, 2024
Homeनंदुरबारखर्डी येथे एकाचा कोयत्याने वार करून खून

खर्डी येथे एकाचा कोयत्याने वार करून खून

अक्कलकुवा । श. प्र. Akkalkuva

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात किरकोळ वादातून काही लोकांनी मिळून एकावर कोयत्याने वार करत गंभीरित्या जखमी केल्याची घटना घडली. जखमी व्यक्तीला धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा झाला.

- Advertisement -

दरम्यान, जोपर्यंत हल्लेखोरांवर कारवाई केली जात नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला. धडगाव तालुक्यातील खर्डी येथे किरकोळ वादातून काही लोकांनी मिळून एकावर कोयत्याने वार करत गंभीरित्या जखमी केल्याची घटना घडली. जखमी व्यक्तीला धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान त्याचा झाला. वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला हे अद्यापही स्पष्ट नाही. कोयत्याच्या वारामुळे संबंधित व्यक्तीच्या हातापायाला खोल जखमा झाल्या. त्यातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.धडगाव तालुक्यात किरकोळ वादातून खून केल्याच्या घटना दिवसेदिवस वाढत असून लोकांमध्ये कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही. त्यामुळेच या प्रकारच्या घटना सातत्याने वाढत आहेत.दरम्यान, जोपर्यंत हल्लेखोरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या