Friday, April 25, 2025
Homeनगरकांदा व बासमतीचे किमान निर्यात मूल्य काढल्याने शेतकर्‍यांना दिलासा

कांदा व बासमतीचे किमान निर्यात मूल्य काढल्याने शेतकर्‍यांना दिलासा

लोणी |वार्ताहर| Loni

देशासह महाराष्ट्रातील लाखो कांदा (Onion) व बासमती तांदूळ (Basmati Rice) उत्पादक शेतकर्‍यांचे हित साधण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) किमान निर्यात मूल्यावर (एमईपी) असलेल्या अटी रद्द केल्या आहेत. यामुळे शेतकरी कोणत्याही प्रकारचे शुल्क न देता कांदा व बासमती तांदूळ निर्यात करू शकतील. शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल (Commerce and Industry Minister Piyush Goyal) यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे तर कोंकण (Kokan) व पूर्व विदर्भात बासमती (Basmati Rice) व इतर तांदळाच्या वाणाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे हित साधले जाणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. कांदा उत्पादकांचे उत्पन्न वाढणार- केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अधिनस्त विदेशी व्यापार महासंचालक संतोष कुमार यांनी अधिसूचना जारी करून कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेले किमान निर्यात मूल्य तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत रद्द केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक (Onion Grower) शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचा चांगला भाव मिळेल, असा विश्वास ना.विखे पाटील यांनी व्यक्त केला.

यापूर्वी काद्यावर 550 डॉलर प्रति टन एमईपी आकरली जात होती. बासमती तांदळाची निर्यात वाढेल सोबतच केंद्र सरकारने बासमती तांदळावर लावलेला 950 डॉलर प्रती टन निर्यात मूल्य देखील रद्द केला आहे. यामुळे विदर्भातील बासमती तांदूळ(Basmati Rice) उत्पादकांना त्यांचा तांदूळ थेट विदेशी बाजारात विक्रीसाठी पाठविता येणार आहे. शेतकर्‍यांकडून बासमती तांदळाची निर्यात वाढणार असून धान उत्पादकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल असेही ना.विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना म्हाडाचे घर- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा...