Thursday, April 9, 2026
Homeक्राईमKarjat : कांद्याच्या पिकात अफूची शेती

Karjat : कांद्याच्या पिकात अफूची शेती

47 लाखांचा मुद्देमाल जप्त

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील चापडगाव (Chapdgaon) येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या अफूच्या झाडांची (Opium Tree) लागवड करून त्याची जोपासना करणार्‍या एका व्यक्तीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) रंगेहात पकडत तब्बल 47 लाख 64 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या लागवडीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कर्जत (Karjat) तालुक्यात तपास सुरू केला होता.

- Advertisement -

यावेळी गुप्त बातमीदारामार्फत चापडगाव येथील परमेश्वर बन्सी घनवट (वय 68) हा शेतात अफूच्या झाडांची लागवड (Opium Tree) करून त्याचे संगोपन करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत चापडगाव शिवारातील गट क्रमांक 13 मध्ये छापा (LCB Raid) टाकला. छाप्यात शेतात अफूची (Farm Opium Tree) मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आढळून आली. आरोपी शेतातच राखण करताना दिसून आला. चौकशीत त्याने दोन ते तीन महिन्यांपूर्वी अफूची लागवड करून त्याची निगा राखत असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीच्या शेतातून 238.239 किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली असून त्याची बाजारमूल्य 47 लाख 64 हजार 180 रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशन (Karjat Police Station) येथे येथे गुंगीकारक औषधिद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिसांनी संयुक्तरीत्या केली.

ताज्या बातम्या

Crime News : वकीलाने मागितली डॉक्टर तरूणीकडे दोन लाखांची खंडणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात नोकरीसाठी अर्ज देण्यास आलेल्या एका डॉक्टर तरूणीचा पाठलाग करून, त्यांचे व त्यांच्या बहिणीचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...