Friday, May 3, 2024
Homeनाशिककांदा उत्पादक शेतकरी संघटना मंगळवारी कसमादेत

कांदा उत्पादक शेतकरी संघटना मंगळवारी कसमादेत

नाशिक । Nashik

महाराष्ट्रात कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या कळवण, सटाणा, देवळा व मालेगाव भागात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील हे स्वतः सद्यस्थितीतील कांदाचाळी मधील कांद्याची स्थिती, बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारा दर याविषयी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या भावना जाणून घेण्यासाठी मंगळवारी ( दि.११)दौरा करणार आहेत.

- Advertisement -

मागील 4-5 महिन्यांपासून करोनाच्या महामारीमुळे देशात सुरू असलेल्या सततच्या लाॅकडाऊन व कांदा निर्यातीवर आलेल्या मर्यादा तसेच देशांतर्गत कांद्याला मिळणारा कवडीमोल दर यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे . एकीकडे उत्पादन खर्चा पेक्षाही निम्म्या दराने कांदा विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आलेली असतांना दुसऱ्या बाजूला कांदा निम्म्यापेक्षाही जास्त कांदा चाळींमध्येच सडत असल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.

सरकारने याप्रश्नी तात्काळ लक्ष घालावे, यासाठी कांद्याचे आगार असलेल्या कसमादे पट्ट्यात भारत दिघोळे व शैलेंद्र पाटील यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा होणार आहे. कांदा प्रश्नावरील महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची पुढील भूमिका काय असेल याचा निर्णय यावेळी घेतला जाणार आहे.

यावेळी भारत दिघोळे , शैलेंद्र पाटील, संपर्कप्रमुख कुबेर जाधव, प्रदेश संघटक कृष्णा जाधव यांच्यासह कसमादे पट्ट्यातील सर्व बाजार समित्यांनाही प्रत्यक्ष भेट देणार असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, जिल्हा सरचिटणीस दुष्यंत पवार, मालेगाव तालुकाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, मालेगाव तालुका कार्याध्यक्ष जितेंद्र राऊत, कळवण तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, देवळा तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, सटाणा तालुकाध्यक्ष हेमंत बिरारी, कळवण तालुका कार्याध्यक्ष ओंकार पाटील, सटाणा तालुका कार्याध्यक्ष अभिमन पगार नाशिक जिल्हा युवा उपाध्यक्ष शेखर कापडणीस देवळा तालुका सरचिटणीस भगवान जाधव यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या