Wednesday, March 26, 2025
Homeक्राईमNashik Crime News : कांदा व्यापाऱ्यास १५ लाखांचा गंडा

Nashik Crime News : कांदा व्यापाऱ्यास १५ लाखांचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

परदेशात कांदा (Onion) निर्यात करण्यासाठी खरेदी करून संशयितांनी एका व्यापाऱ्यास (Trader) तब्बल १५ लाख ३४ हजारांचा गंडा घातला आहे. नितीन जिवारक, युगंधर पालोदकर असे संशयितांची नावे आहेत. तर, कांदा व्यापारी अजय ओकांर मिश्रा (रा. नंदिनी बंगला, गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०२२ मध्ये संशयितांच्या मार्फत मलेशिया येथे कांदा निर्यात करण्यासंदर्भात ठरले होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : खंडणीखाेर बनला ‘कार डिलर’; भागवत बंधुंच्या अपहरणातील सराईत गुन्हेगार अटकेत

त्यानुसार, मिश्रा यांनी स्वखर्चाने कांदा (Onion) खरेदी करून प्रतवारीनुसार त्याची बांधणी केली आणि संशयितांच्या समुदेरा शिपींग लाईन लि.मार्फत १७ लाख ३४ हजार रुपयांचा ६० टन कांदा निर्यात केला. त्यावेळी संशयित युगंधर याने मिश्रा यांच्या एसएम ट्रेडलिंकच्या खात्यावर दोन लाख रुपये वर्ग केले.

हे देखील वाचा : अधिकार्‍यांचा दृष्टीकोन यापुढे संपूर्ण सरकारी असला पाहिजे – गृहमंत्री अमित शाह

दरम्यान, त्यानंतर उर्वरित पैशांची (Money) मागणी केली असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. मात्र अद्यापही संशयितांनी (Suspected) उर्वरित १५ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम दिलेली नाही. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात (Mumbai Naka Police) फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल झाला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...