Friday, November 22, 2024
Homeक्राईमऑनलाईन बिंगो, दारूवर एलसीबीची छापेमारी

ऑनलाईन बिंगो, दारूवर एलसीबीची छापेमारी

अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त || 16 ठिकाणी कारवाई, 22 जणांवर गुन्हे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवार व रविवार दोन दिवस जिल्ह्यातील ऑनलाईन बिंगो, अवैध देशी, विदेशी दारू तसेच गावठी हातभट्टी अशा 16 ठिकाणी छापेमारी करून दोन लाख 43 हजार 275 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 22 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

किशन संजय कांबळे (वय 27, रा. सोळातोटी कारंजा, नगर), नितीन राजन्ना भिंगारे (वय 50, रा. राज चेंबर मागे, मंगलगेट, नगर), राजेंद्र विलास पवार (रा. खातगाव टाकळी, ता. नगर), वर्षा रमेश गुंजाळ (रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा), मयुर दिलीप कांबळे (वय 20, रा. श्रीगोंदा कारखाना, ता. श्रीगोंदा), वेंकटेश रामचरण सोनकरीवार (वय 54, रा. श्रीगोंदा कारखाना, ता. श्रीगोंदा), ऋषीकेश शरद राक्षे (वय 28, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा), राधेशाम शिवशंकर तिवारी (वय 34, रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा), बिराजदार धोंडीबा कुर्‍हाडे (वय 52, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा), इम्रान अब्दुल रहिम शेख (वय 33), युनूस चाँद शेख (वय 28, दोघे रा. कुकाणा, ता. नेवासा), उत्तम दौलत कोल्हे (वय 55, रा. शहर टाकळी, ता. शेवगाव), संदीप भाऊसाहेब मोरे (वय 30, रा. बत्तरपूर, ता. शेवगाव), सुरेश लक्ष्मण नजन (वय 32), रामेश्वर भरतरी नजन (वय 27), भारत बाबासाहेब चोपडे (वय 31, तिघे रा. भातकुडगाव, ता. शेवगाव), गणेश विष्णू आंधळे (वय 34, रा. सोनसागवी, ता. शेवगाव), शौकत दिलदार शेख (वय 24, रा. राक्षी, ता. शेवगाव), ऋषीकेश उध्दव पातकळ (वय 19, रा. चापडगाव, ता. शेवगाव), ज्ञानेश्वर अण्णा उरूणकर (वय 42, रा. मिरी, ता. पाथर्डी), राजू जनार्दन सातपुते (वय 40, रा. साकेगाव, ता. पाथर्डी), गणेश आबासाहेब कराळे (वय 24, रा. कामत शिंगवे, ता. पाथर्डी) अशी गुन्हे दाखल झालेल्या अवैध धंदे करणार्‍यांची नावे आहेत.

सदरची कारवाई अधीक्षक ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अमोल भारती, पोलीस उपअधीक्षक (कर्जत) विवेकानंद वखारे व पोलीस उपअधीक्षक (शेवगाव) सुनील पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या