Monday, November 25, 2024
Homeक्रीडाझारखंडचा आर्को कुंडू अजिंक्यवीर

झारखंडचा आर्को कुंडू अजिंक्यवीर

नाशिक । Nashik

जिमखाना ऑनलाईन स्पर्धेत आर्को कुंडू या झारखंड मधील खेळाडूने 9 पैकी 9 फेर्‍या जिंकत विजेतेपद तर अर्चित रहाळकर या नाशिक मधील खेळाडूने 8 गुणांसह उपविजेतेपद पटकावले.

- Advertisement -

नाशिकच्याच छोट्याशा तनिष्का राठीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत 7 गुणांसह तिसर्‍या स्थानावर झेप घेतली.

नाशिक जिमखानाच्या वतीने 14 वर्षांखालील खेळाडूंसाठी ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती, त्याला बुद्धिबळ चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत संपूर्ण भारतभरातून या स्पर्धेसाठी 86 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

झारखंड, कर्नाटक या राज्यां व्यतिरिक्त महाराष्ट्रातील सांगली, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, जळगाव आदी जिल्ह्यातील बाल चमूंनी स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले. प्रवेशापासून ते बक्षीस वितरणा पर्यंत सर्वकाही ऑनलाईन असलेल्या या नावीन्यपूर्ण स्पर्धेत बुद्धिबळा सारख्या पारंपरिक खेळाला चांगला प्रतिसाद लाभला.

आर्को कुंडू या झारखंड मधील खेळाडूने 9 पैकी 9 फेर्‍या जिंकत विजेतेपद तर अर्चित रहाळकर या नाशिक मधील खेळाडूने 8 गुणांसह उपविजेतेपद पटकावले. नाशिकच्याच छोट्याशा तनिष्का राठीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत 7 गुणांसह तिसर्‍या स्थानावर झेप घेतली. स्पर्धेतील दहा विजेत्या खेळाडूंसह 3 भाग्यशाली विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

बुद्धिबळ स्पर्धांमधील अतिजलद स्वरूपात प्रत्येक खेळाडूस आपले कौशल्य दाखविण्यास पाचच मिनिटे मिळत असल्याकारणाने त्यास तेवढ्या कमी कालावधीत आपले कौशल्य पणास लावत अचूक निर्णय घ्यावे लागतात,खेळाडूच्या बौद्धिक क्षमतेचा कस लागत असल्याकारणाने अशा प्रकारच्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन देशविदेशात मोठ्या प्रमाणात केले जाते.

सातत्याने बुद्धिबळ विश्वाचा मागोवा घेत नावीन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि त्याला उस्फुर्त प्रतिसाद लाभला असल्यामुळे भविष्यातही अश्या स्पर्धांचे आयोजन करण्याचे संस्थेने ठरवले आहे.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिमखाना बुद्धिबळ प्रशिक्षक फिडे पंच मंगेश गंभीरे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली तर संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव राधेशाम मुंदडा तथा सहसचिव शेखर भंडारी व बुद्धिबळ सेक्रेटरी जहागीरदार यांनी सहभागी सर्व खेळाडूंचे आभार मानले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या