Saturday, July 13, 2024
Homeनगरऑनलाईन खरेदीत वकिलाची फसवणूक; खात्यातून गेले पैसे

ऑनलाईन खरेदीत वकिलाची फसवणूक; खात्यातून गेले पैसे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

ऑनलाईन मागितलेल्या औषधांची डिलीव्हरीसाठी पत्ता व्हेरीफाय करण्याकरिता आलेली लिंक ओपन केल्याने वकिलाच्या बँक खात्यातून चार हजार 896 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली आहे. रविवारी (दिनांक 14 मे) ही घटना घडली असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तारकपूर परिसरात राहणारे वकिल यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मुलीने केरळ येथून ऑनलाईनव्दारे औषधे मागितली होती. त्याची डिलीव्हरी 14 मे रोजी असल्याने मुलीच्या मोबाईल नंबरवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला की, तुमचे कुरीयर आले आहे. परंतु तुमचा पत्ता व्हेरीफाय न झाल्याने तुमचे पार्सल परत गेले आहे. त्याकरिता तुम्ही पाच रुपये आम्ही पाठवित असलेल्या लिंकवरून पाठवा, असे सांगून मुलीच्या मोबाईलवर लिंक पाठविली.

परंतु मुलीच्या मोबाईला कोणत्याही बँकेची ऑनलाईनची सुविधा नसल्याने तिने सदरची लिंक फिर्यादीच्या मोबाईलवर पाठविली. फिर्यादीने त्यावर क्लीक करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाच रुपये पाठविण्याचा प्रयत्न केला असता, ती रक्कम गेली नाही. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 1 हजार 999, एक हजार 898 व 999 असे एकूण चार हजार 896 रुपये रक्कम काढून घेत फसवणूक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या