नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar
कृषी विभागाच्या भरारी पथकाने नंदुरबार तालुक्यातील बामडोद येथील मंजुळा नर्सरी येथे धाड टाकून सुमारे तीन लाखाचे बोगस बियाणे जप्त केले आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही धाड टाकण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील बामडोद येथील सुरेश हिरामण पाटील यांच्या मंजुळाबाई नर्सरी येथे छापा टाकला असता तेथे गॅलेक्सी 5 जी हे सुमारे तीन लाखाचे जप्त करण्यात आले.
भरारी पथकाने यापुर्वीच बामडोद, खोंडामळी, भागसरी, विखरण या गावात गस्त वाढविली होती. हे बोगस बियाणे अहमदाबाद येथुन सुरेश पाटील यांच्या नावाने आली होती. त्यात एकूण 1 लाख 43 हजार रूपये किंमतीची 102 पाकीटे बोगस बियाणे होते. सदर बियाणे जप्त करण्यात आले. सुरेश हिरामण पाटील, दिपक बन्सी कोळी यांच्याविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता नियंत्रक तंत्र अधिकारी संजय शेवाळे, कृषी विकास अधिकारी पी.आर. खरमाळे, कृषी अधिकारी योगेश हिवराळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी, महेश पाटील, ज्ञानेश्वर बाविस्कर, तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके यांच्या पथकाने उपस्थित होते.