Tuesday, May 28, 2024
Homeदेश विदेशOperation Ajay : 'ऑपरेशन अजय' सुरू! इस्राइलच्या युद्धभूमीतून २१२ भारतीय परतले मायदेशी

Operation Ajay : ‘ऑपरेशन अजय’ सुरू! इस्राइलच्या युद्धभूमीतून २१२ भारतीय परतले मायदेशी

दिल्ली | Delhi

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. इस्रायलमधल्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्याची मोहीम सुरु झाली आहे. ऑपरेशन अजय असं नाव या मोहिमेला देण्यात आलं आहे. याच अंतर्गत २१२ भारतीयांना घेऊन पहिलं विमान बेन गुरियन विमानतळावरुन दिल्ली विमानतळावर पोहचलं आहे. एअर इंडियाचं हे विमान आज सकाळी ६ वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झालं. त्यावेळी दिल्ली विमातळावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी इस्रायलहून आलेल्या भारतीयांचं स्वागत केलं.

- Advertisement -

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम…”; ‘व्हायब्रंट गुजरात’ कार्यक्रमावरून राऊतांनी शिंदेंना डिवचलं

इस्त्राइल आणि हमास यांंच्यात गेल्या शनिवारपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत अडीच हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धामुळे इस्त्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन अजय मोहीम हाती घेतली जात असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २१२ भारतीय आपल्या मायदेशी आले आहेत. आज सकाळी दिल्ली विमानतळावर पहिले विमान उतरले.बेन गुरियन विमानतळावरून भारतीयांना घेऊन एका खासगी विमानाने भारताच्या दिशेने रात्री नऊ वाजता उड्डाण केले. ज्या भारतीयांना मायदेशी परतायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही सेवा भारत सरकारने उपलब्ध करून दिली होती.

शेतीच्या वादातून गोळीबाराचा थरार! सहा गोळ्या झाडून पिस्तूल केलं रिकामं

७ ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर, एअर इंडियाने इस्रायलमधून आपली सर्व उड्डाणे तात्काळ बंद केली होती. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. त्यासाठी गुरुवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, इस्रायलमध्ये सुमारे १८ हजार भारतीय वंशाचे लोक राहतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या