Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशOperation Sindoor: "ऑपरेशन सिंदूर दरम्यान बुद्धिबळाच्या पटावर खेळल्या तशा…", सेना प्रमुखांनी सांगितला...

Operation Sindoor: “ऑपरेशन सिंदूर दरम्यान बुद्धिबळाच्या पटावर खेळल्या तशा…”, सेना प्रमुखांनी सांगितला पाकिस्तानवरील हल्ल्याचा प्लॅन

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत-पाकिस्तान संघर्ष आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी मात्र त्यांनी आपण जिंकल्याचा आव आणत, जगभरात आपलाच विजय झाल्याचे म्हटले होते. पाकिस्तानच्या या खोट्या नरेटीव्हचा भारताने वेळोवेळी बुरखा फाडला आहे. याबद्दल आता भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. ते आयआयटी मद्रास येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सर्वोच्च लष्करी आणि राजकीय नेतृत्वाची एक महत्त्वाची बैठक पार पडली.

- Advertisement -

द्विवेदी कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले, युद्धात नरेटिव्ह मॅनेजमेंटची महत्त्वाची भूमिका असते. याचे उदाहरण देताना ते म्हणाले, “जर तुम्ही एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला विचारले की, तुम्ही हरला की जिंकला? तर ते म्हणतील आमचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल बनले आहेत. याचा अर्थ आम्ही नक्कीच जिंकलो असू.” यानंतर त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान बुद्धिबळाच्या पटावर खेळल्या जातात तशा चाली आम्ही खेळले, असेही सांगितले.

YouTube video player

भारतीय सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर काय घडले आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांनी मोठी माहिती सांगितली. या व्यक्तव्यातून जनरल द्विवेदी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या फील्ड मार्शलपदी नियुक्तीवरही टीका केली आहे. यासोबतच, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत ते म्हणाले की, “केंद्र सरकारने सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. यामुळेच आपण पाकिस्तानला धडा शिकवण्यात यशस्वी झालो आहोत.”

तीनही सशस्र दलांना मोकळीक दिली
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण होते. सर्वांना पाकिस्तानकडून बदला घ्यायचा होता. हल्ल्याच्या २४ तासांच्या आत संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत थेट आणि स्पष्ट आदेश देण्यात आले. आता काहीतरी मोठे करायचे आहे. आता हे पुरे झाले. आम्हाला, लष्कर प्रमुखांना, पाकिस्तानकडून बदला घेण्याची संपूर्ण रणनीती बनवण्याचे काम देण्यात आले होते. या विश्वासामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आहे, असे जनरल द्विवेदी म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर नावाने देशाला प्रेरणा मिळेल
उपेंद्र द्विवेदी पुढे म्हणाले, २५ तारखेला आम्ही सात ते नऊ लक्ष्य निर्धारित केले होते. त्याबद्दल योजना तयार केली आणि त्याप्रमाणे लक्ष्य भेद केला. तत्पूर्वी २९ एप्रिल रोजी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्याचे ठरले. या नावाने संबंध देशाला प्रेरणा मिळाली. यामुळेच ऑपरेशन सिंदूर का थांबवले? असा प्रश्न अनेकांनी विचारला. पण त्याचे समर्पक उत्तर आधीच देण्यात आलेले आहे.

बुध्दिबळाच्या पटावर खेळल्या जातात तशा चाली खेळलो
“ऑपरेशन सिंदूर दरम्यान आम्ही बुद्धिबळाच्या पटावर खेळल्या जातात तशा चाली खेळत होतो. शत्रूची पुढची चाल काय असेल आणि त्यावर मात कशी करायची? हे त्या त्या वेळी ठरवले जायचे. शत्रूही त्या प्रमाणेच आपल्या चाली खेळत होता. कधी आम्ही त्यांना मात देत होतो तर कधी आम्ही आमच्या जीवावर खेळून शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न करत होतो. हेच तर जीवन आहे”, असेही मत उपेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त केले.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानला झालेल्या नुकसानाबद्दल पहिल्यांदाच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विधान केले. याआधी हवाई दल प्रमुखांनी काल सांगितले होते की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान आम्ही पाकिस्तानचे ५ लढाऊ विमान पाडले आहेत. ३०० किलोमीटर आत घुसून आम्ही त्यांना धडा शिकवला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...