Wednesday, January 7, 2026
HomeनगरOperation Sindoor : सैन्यदलाची कामगिरी देशवासियांचा...; पालकमंत्री विखे पाटील काय म्हणाले!

Operation Sindoor : सैन्यदलाची कामगिरी देशवासियांचा…; पालकमंत्री विखे पाटील काय म्हणाले!

लोणी |वार्ताहर| Loni

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) यशस्वी करुन संरक्षण सिध्दता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. दहशतवादाच्या (Terrorism) विरोधातील कठोर कारवाई महत्वपूर्ण असून पहलगाम येथील हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने (Indian Army Force) दिलेले चोख उत्तर कौतुकास्पद आहे. सैन्यदलाची कामगिरी देशवासियांचा अभिमान वाढविणारी असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

पहलगाम (Pahalgam) येथे 26 भारतीय पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले होते. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी अतिशय संयमाने दहशतवाद्यांच्या या कृत्याला चोख उत्तर देवून आतंकवाद कधीही सहन करणार नाही असा इशाराच या अभिमानास्पद कामगिरीतून दिला असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.

YouTube video player

दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करुन भारतीय सैन्य दलाने आपली संरक्षण सिध्दता दाखवून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सैन्यदलाचे त्यांनी अभिनंदन केले. केंद्र सरकारने पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचे गांभिर्य लक्षात घेवून देशवासियांच्या मनामध्ये असलेली भावना कृतीत उतरविली असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...