दिल्ली | वृत्तसंस्था
आज रात्री राजस्थान, जम्मू, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांच्या सीमा भागात पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न केले आहेत. दरम्यान भारतीय लष्काराने पाकिस्तानच्या या नापाक इराद्याना जोरदार प्रत्युतर देत ड्रोन हल्ले हवेतच हाणून पाडले आहेत.दरम्यान, उरी मध्ये देखील पाकिस्तान कडून गोळीबार करून नागरी वस्त्यांना लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
श्रीनगरहून देखील पाकचे सर्व ड्रोन भारतीय लष्कराने पाडल्याचे वृत्त आहे. आज पाकिस्तान कडून गुजरातला देखील लक्ष करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून जम्मू विभागातील राजौरी येथे आणखी एका ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राजस्थानच्या पोखरण मध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आला आहे.पंजाबच्या पठाणकोट मध्ये देखील स्फोटांचे आवाज येत आहेत.
भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने हे सर्व ड्रोन हवेतच पाडले आहेत. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.