दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती कायम आहे. पाकिस्तान कडून LOC वर कुरापत्या करण्यास सुरवात केली आहे. आज अंधार होताच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील उरी, तंगधार, केरन, मेंढर, नौगाम आणि पूंछ या सहा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू केला आहे.
- Advertisement -
जम्मू-कश्मीर, पंजाबमधील फिरोजपूर आणि राजस्थानमधील जैसलमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. जम्मूच्या अनेक भागात स्फोटांचे आवाज येत असून दरम्यान भारतीय लष्करा कडून हे हल्ले परतवून लावले जात आहे. दरम्यान राजस्थानच्या पोखरण मध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडण्यात आला आहे.पंजाबच्या पठाणकोट मध्ये देखील स्फोटांचे आवाज येत आहेत.