नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदुर नंतर पहिल्यांदाच आज रात्री 8 वाजता देशवासीयांना संबोधित केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाची ताकद आणि संयम पाहिला आहे. सर्वप्रथम, मी प्रत्येक भारतीयांच्यावतीने भारताच्या बलाढ्य सैन्याला, आपल्या गुप्तचर संस्थांना आणि आपल्या शास्त्रज्ञांना सलाम करतो. ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी आपल्या शूर सैनिकांच्या अफाट शौर्याला मी सलाम करतो. आज मी त्यांचे शौर्य आणि धैर्य आपल्या देशातील प्रत्येक आई आणि बहिणीला समर्पित करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
22 एप्रिल रोजी पहलगाम रोजी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, त्याने देश आणि जगाला हादरवले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, सर्व पक्ष एका सुरात दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाईसाठी एकजूटला होता. आपण दहशतवाद्यांना मातीत घालण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सुट दिली. आज प्रत्येक दहशतवादी, दहशवाद्यांचं प्रत्येक संघटनेला कळून चुकलंय की, आपल्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो. ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नाही. ते देशाच्या कोटी कोटी लोकांची भावनाचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायची अखंड प्रतिज्ञा आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
दहशतवाद आता भारत सहन करणार नाही. पाकिस्तानच सरकार दहशदवाद्यांना ज्या प्रकारे पोसतं आहे. त्यावरून हे दिसतं आहे की, हे दहशतवादी एक दिवस पाकिस्तानला संपवतील. पाकिस्तानला त्यांचा दहशतवादी ढाचा उद्ध्वस्त करावा लागेल. टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही. आज मी सगळ्या जगाला सांगतो जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर ती पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादी कारवाया यांच्यावरचं होईल. मी पुन्हा एकदा भारतीय सैन्य दलाला सॅल्युट करतो असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.