Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाबातमी नवोदित खेळाडूंसाठी : नैपुण्य चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा इथे

बातमी नवोदित खेळाडूंसाठी : नैपुण्य चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा इथे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व आर्मी स्पोर्टस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील बॉईज स्पोर्ट्स संस्थेत (Boys Sports Institute) प्रवेश (Admission) घेण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत दि. ४ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हास्तरीय नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे….

- Advertisement -

जिल्ह्यातील खेळाडूंनी डायव्हिंग (Diving), ॲथलेटिक्स (Athletics), बॉक्सिंग (Boxing), कुस्ती (Wrestling), तलवारबाजी (Fencing), वेटलिप्टींग (Weightlifting) या खेळाच्या चाचण्यांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक (Ravindra Naik) यांनी केले आहे.

लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंची निवडकरून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सुसंघटीत प्रयत्न जिल्हा क्रीडा विभागामार्फत करण्यात येत आहे.

या नैपुण्य चाचण्यांचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी येथे आयोजन करण्यात आले आहे. डायव्हिंग या खेळासाठी वयोमर्यादा ८ ते १२ असून, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिप्टींग या खेळांसाठी वयोमर्यादा १० ते १४ असणार आहे.

चाचण्यांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित खेळाडूंकडे खेळाचे प्रमाणपत्र व जन्म दाखला असणे आवश्यक आहे. दि. १ जानेवारी २०२२ रोजी खेळाडूचे वय ८ ते १४ असणे आवश्यक आहे.

संबंधित खेळाच्या नैपुण्य चाचणीत भाग घेण्यासाठी खेळाडूंनी खेळाच्या प्रकारानुसार त्यादिवशी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहावे लागणार आहे.

अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक राजेश क्षत्रिय (Rajesh Kshatriya) यांच्याशी संपर्क साधवा, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सांगितले आहे.

असे असेल वेळापत्रक

ॲथलेटिक्स व वॉकींग (चालणे) : दि. ४ ऑक्टोबर

बॉक्सिंग : दि. ६ ऑक्टोबर

तलवारबाजी : दि. ६ ऑक्टोबर

कुस्ती : दि. ७ ऑक्टोबर

अर्चरी : दि. ऑक्टोबर

वेटलिप्टींग : दि. ८ ऑक्टोबर

डायव्हिंग : दि. ८ ऑक्टोबर

- Advertisment -

ताज्या बातम्या