Monday, May 27, 2024
Homeनाशिकएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त व मयत वारसदार यांना प्रलंबित देय लाभ वेळेत देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्या कार्यालयात 31 जुलै रोजी दुपारी 3 वा. पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. अशी माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक जितीन रहमान दिली आहे.

- Advertisement -

त्या अनुषंगाने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालये, आश्रमशाळा व वसतिगृह यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त व मयत वारसदार तसेच संबंधित मुख्याध्यापक व गृहपाल यांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रकल्प कार्यालय, नाशिक येथे वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी रहमान यांनी केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या