Sunday, November 24, 2024
Homeनाशिकशंकराच्या पिंडीवर चढवलेले जल मनातील इच्छा पूर्ण करतात - प. पू. प्रदीप...

शंकराच्या पिंडीवर चढवलेले जल मनातील इच्छा पूर्ण करतात – प. पू. प्रदीप मिश्रा

आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या माध्यमातून शिवमहापुराण कथेचे आयोजन

नांदगाव। प्रतिनिधी
आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या माध्यमातून शिवमहापुराण कथेच्या आयोजनामुळे नांदगाव तालुक्यातील जनतेची पुर्वपुण्याई आहे. भगवान शंकराच्या पिंडीवर चढवलेले जल मनातील इच्छा पूर्ण करतात. मेहनत, कर्म आणि श्रद्धा यांची जोड असल्याने शिव भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. असे प्रतिपादन शिवमहापुराण कथाकार जगप्रसिद्ध प.पू. प्रदीप मिश्रा यांनी हिसवळ बुद्रुक येथे केले..

पंडित मिश्रा म्हणाले की, भगवान शंकराच्या पिंडीवर चढवलेले जल मनातील इच्छा पूर्ण करतात. मेहनत, कर्म आणि श्रद्धा यांची जोड असल्याने शिव भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. मेहनतीला अध्यात्माची जोड दिल्यास आयुष्याचे कल्याण होईल. सेवा धर्म वाढवा, भाव आणि श्रद्धेने कथा श्रवण करा, निर्मल मन ठेवा, श्रद्धेने ध्यान करा, शिव प्रसन्न होतील.असेही पंडित प्रदीप मिश्रा यांनी या शिव महापुराण कथेत नमूद केले..

- Advertisement -

शिवमहापुराण कथेच्या सुरुवातीला आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या हस्ते शिव महापुराण कथेचे विधिवत पुजा करण्यात आली. कथेचा सांगता शिवशंकराच्या आरतीने करण्यात आली. शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो शिवभक्तांनी कथा श्रवणासाठी केलेल्या गर्दीला मिनी कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.

नांदगाव तालुक्यातील नांदगाव – मनमाड रस्त्यावरील असलेल्या हिसवळ शिवारातील ४० एकरावर सुप्रसिध्द शिवमहापुराण कथाकार पंडीत प्रदिप मिश्रा यांचे आज पासून शिवमहापुराण कथेचे वाचन सुरू झाले आहे. या कथेस नांदगाव शहर पंचक्रोशीतील भाविकांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तसेच विविध राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहे.

आलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी व त्यांना कथा श्रवण करता यावी म्हणुन नांदगाव – मनमाड येथून एसटी बसची व्यवस्था आमदार सुहास कांदे यांनी स्वखर्चातून केली आहे. तर कार्यक्रस्थळी भाविकांची जेवनाची तसेच राहण्याची, आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. कार्यक्रमस्थळी पंखे, कुलर यांची व्यवस्था करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. . शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी लाखो भाविक उपस्थित झाले होते. कार्यक्रमाची सांगता शिवशंकराच्या आरतीने करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्तासह संयोजकांनी परिश्रम घेतले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या