Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्याआंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ओझर विमानतळ सज्ज

आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ओझर विमानतळ सज्ज

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

- Advertisement -

ओझर विमानतळावरून Ozar Airport देशभरातील सहा प्रमुख शहरांसाठी विमानांची उड्डाणे सुरू झाली आहेत. देशातच नव्हे तर परदेशासाठीही विमानसेवा असावी यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनादेखील यश मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय हवाई सेवेसाठी international flights ओझर येथे एचएएल प्रशासनाने HAL Administration दोन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी आवश्यक असणारी इमिग्रेशनची परवानगी मिळताच या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे MP Hemant Godse यांनी दिली.

देश-विदेशात जाण्यासाठी ओझर येथून विमानसेवा असावी यासाठी खा. गोडसे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्राने ‘उडाण’ योजनेअंतर्गत ओझर येथून देशभरातील अहमदाबाद, दिल्ली, सुरत, पुणे आणि बेळगाव या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू केलेली आहे. या विमानसेवेला नाशिककरांकडून योग्य प्रतिसाद मिळत असल्याने ही सेवा नियमितपणे सुरू आहे. देशांतर्गत मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन येथून आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरू व्हावी यासाठी खा. गोडसे यांनी प्रयत्न सुरू केले होते.

या प्रस्तावाला दोन वर्षांपूर्वी केंद्राने हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानंतर येथील विमानतळावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामासाठी निधीचा प्रश्न निर्माण झाला होता. खा. गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एचएएल प्रशासनाने दोन कोटींचा निधी खर्च करून आजमितीस या विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी लागणार्‍या सर्व सुविधांची निर्मिती पूर्ण केली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी लागणार्‍या आवश्यक त्या सर्व परवानग्याही मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खा. गोडसे यांनी येथील ओझर विमानतळावर जाऊन उभारण्यात आलेल्या सर्व सोयी- सुविधांची पाहणी केली. यावेळी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एचएएल प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या इमिग्रेशन चेक पॉईंट, कस्टम, प्रस्थान सुविधा आणि स्वतंत्र आगमन आदी सोयी-सुविधा पाहून खा.गोडसे यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे यापुढे उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक, यात्रेकरू आणि व्यावसायिकांना परदेशात जाण्यासाठी मुंबईसह इतर विमानतळांवर जाण्याची गरज राहणार नाही. तसेच शेतकर्‍यांनाही आपला शेतीमाल विक्रीसाठी परदेशात पाठवणे शक्य होणार असल्याचे खा. गोडसे यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ओझर विमानतळ सज्ज झाले असून इमिग्रेशनची परवानगी मिळताच आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाण सुरू होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या