Friday, May 3, 2024
Homeनगरपाचेगावच्या विशेष ग्रामसभेत वाळू लिलावास ग्रामस्थांनी केला विरोध

पाचेगावच्या विशेष ग्रामसभेत वाळू लिलावास ग्रामस्थांनी केला विरोध

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नदीपात्रातील वाळू साठ्याचे लिलाव करणे कामी ग्रामसभेची शिफारस अनिवार्य असल्याने नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे अहमदनगरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी वाळू लिलावास तीव्र विरोध दर्शवला. वाळू लिलावाचे नवीन शासन नियम गावकर्‍यांना सांगण्यासाठी ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.

- Advertisement -

मंगळवारी दुपारी चार वाजता पाचेगावच्या वहाडणे सभागृहात ही विशेष ग्रामसभा पार पडली. यावेळी श्री. अर्जुन यांनी वाळू लिलाव झाला तर या निधीतून स्थानिक ग्रामपंचायतीला 10 टक्के निधी उपलब्ध होईल. त्यात तुम्ही गावाचा विकास साधू शकता, असे सांगितले. हे काम पूर्ण सीसी कॅमेरा अंतर्गत चालणार असून वाळू वाहतूक वाहनांना जेपीएस चा वापर असणार. त्यामुळे वाळू कुठे चालली हे देखील शासनाला समजणार आहे. ज्या गावाचा वाळू लिलाव होईल अशा गावातील शासन नियमानुसार आपण गावातीलच सरपंच, उपसरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांची कमिटी स्थापन करणार व वाळू त्यांच्या देखरेखीखाली लिलाव चालणार व त्यात काही अनुचित प्रकार घडला तर शासनाच्या नियमानुसार त्यांच्या वर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.

ग्रामसभेत पाचेगाव ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकार्‍यांनी सांगितलेले वाळू लिलावाचे शासनाचे नवे नियम ऐकून घेतले. मात्र वाळू लिलावास गावाचा असलेला कडाडून विरोध कायम स्पष्ट केले.

ग्रामस्थांच्या विरोधामुळे अधिकार्‍यांनी सांगितले की, तुमचा ग्रामस्थांचा वाळू लिलावास विरोध आहे, असे मी शासनस्तरावर कळवित आहे. वाळू लिलाव झाल्यास पाचेगाव हे पूर्णतः वाळवंट होईल. वाळू मुळेच या भागात पाणी आज टिकून आहे.आजअखेर वाळू लिलवास हे गाव विरोध करीत असले तरी त्यात वाळूचे संरक्षण देखील करीत असल्याचे त्यांनी मान्य केले. 26 मे 2022रोजी नेवासा तहसीलदार यांना वाळू लिलाव बंदी ठराव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सादर केला आहे.

वाळू लिलाव विरोधात हे गाव पहिल्यापासून अग्रेसर आहे आणि भविष्यात देखील राहील. वाळू लिलाव ग्रामसभेस उपविभागीय अधिकारी श्रीमती पाटील, तहसीलदार रुपेश सुराणा, मंडल अधिकारी तृप्ती साळवे, नायब तहसीलदार श्रीमती पारखे, पंचायत समिती विस्तार अधिकारी रखमाजी लांडे, तलाठी राहुल साठे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी वाघूरवाघ, सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच श्रीकांत पवार,तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब उंडे, अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, दिलीप पवार, दिगंबर नांदे, दिगंबर तुवर, दत्तात्रय पाटील, हरिभाऊ तुवर, ग्रामपंचायत सदस्य वामनराव तुवर, नारायण नांदे, बाळासाहेब कुलकर्णी, प्रकाश जाधव, रवींद्र देठे, बाबा राक्षे, अशोक पवार, संदीप शिंदे, भैय्या शेख, शशिकांत मतकर, विशाल नवघरे, चिलीया तुवर, बापू गोरे, डॅनियल देठे, सोमनाथ बर्डे, ज्ञानेश्वर तांबे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य गावांमधूनही झाला विरोध

नेवासा तालुक्यातील पानेगाव, करजगाव, अमळनेर, निंभारी, खुपटी, इमामपूर, गोणेगाव, चिंचबन, पुनतगाव व पाचेगाव येथे ग्रामसभा घेण्यात आल्या. मात्र या सर्वच गावांनी वाळू लिलावास विरोध दर्शविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या