Saturday, July 27, 2024
Homeनगरपाचेगाव परिसरात उन्हाळ कांद्याचे रोप टाकण्यास प्रारंभ

पाचेगाव परिसरात उन्हाळ कांद्याचे रोप टाकण्यास प्रारंभ

पाचेगाव |वार्ताहर| parner

नगर जिल्ह्यातील (Nagar District) कांदा उत्पादक शेतकरी (Onion Growers) उन्हाळ कांदा पिकाच्या (Summer Onion Crop) पूर्व तयारीला लागले असून कांदा रोपे (Onion Seedlings) टाकण्यासाठी सध्या शेतकर्‍यांमध्ये लगबग दिसून येत आहे. गेल्यावर्षी उन्हाळ कांदा बियाण्यात (onion Seeds) प्रचंड वाढ दिसून आली, मात्र यावर्षी कांदा बियाण्याच्या दरात घसरण दिसून येत आहे.

- Advertisement -

या परिसरात ऊस क्षेत्रात वाढ (Increase in sugarcane area) तर दिसणारच पण कांदा (Onion) क्षेत्र देखील वाढणार आहे असे चित्र स्पष्ट दिसते, कारण मागील वर्षीच्या कांदा भावात बर्‍यापैकी दर टिकून असल्याकारणाने कांदा क्षेत्रात वाढ होऊ शकते.

यंदा घरगुती व विविध कंपन्यांच्या कांदा बियाणे (Onion seeds) दरातही मोठी घसरण झाल्याचे पहावयास मिळत आहे.कारण बर्‍यापैकी शेतकर्‍यांकडे बियाणे उपलब्ध आहे. मागील वर्षी मात्र शेतकर्‍यांकडेच कांदा बियाणे (Onion seeds) उपलब्ध नसल्याने बियाण्याच्या दरात वाढ दिसून आली होती. मागील वर्षी विविध कंपन्यांच्या बियाण्याचे दर तीन ते चार हजार रुपये प्रति किलो होते व खाजगी काही शेतकर्‍यांकडे उपलब्ध असणार्‍या बियाण्याला पायलीला दहा हजारांचा भाव मिळाला होता. त्यात काही शेतकर्‍यांना बियाणे विक्रीतून मोठ्या प्रमाणात अर्थप्राप्ती देखील झाली होती.

यंदा मात्र उलटे पाहायला मिळत आहे, शेतकर्‍यांनी पायलीला सहा हजारांचा भाव काढून कांदा बियाण्याची विक्री (Sale of onion seeds) चालू केली आहे.काहींनी सात हजार रुपये दर ठेवला आहे. कृषी केंद्रावर (Agricultural Center) देखील विविध कंपन्यांच्या बियाणे बावीसशे ते अडीच हजार प्रति किलो दराने विक्री चालू झाली आहे. यंदा बर्‍यापैकी कांद्याला (Onion) भाव मिळत गेला. आजही चांगल्या प्रतीचा कांदा (Onion) बावीस रुपये पर्यंत विकतो तर गोल्टीला ही पंधराशे ते सोळाशे दर निघत आहे. दर बर्‍यापैकी असल्याने कांदा (onion) क्षेत्रात वाढ दिसून येणार असल्याचे चित्र या भागात पहावयास मिळणार आहे.

ज्या शेतकर्‍यांकडे कांदा बियाणे (Onion seeds) विक्रीसाठी उपलब्ध आहे असे शेतकरी मागील वर्षीपेक्षा स्वस्त बियाणे जात असल्याची खंत व्यक्त करीत आहेत तर मागील वर्षी पेक्षा स्वस्त बियाणे उपलब्ध होत असल्याने काही शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद पाहायला मिळत आहे.

उन्हाळ कांद्याच्या लागवड (Planting of summer onions) क्षेत्रामध्ये वाढ दिसण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी कांदा पिकविण्यासाठी लागणारा अमाप खर्च पहाता कांदा पिकवणे (Onion ripen0एवढे सोपे राहिलेले नाही. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांदा बियाणे टाकल्यास नोव्हेंबरमध्ये कांदा लागवडी (Onion cultivation) चालू होतात. योग्यवेळी लागवड झाल्यास उत्पादन देखील भरघोस मिळते असा या भागातील शेतकर्‍यांचा अनुभव आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या