Tuesday, March 25, 2025
Homeजळगावमशाल रॅलींनी उजळला पाचोरा मतदारसंघ

मशाल रॅलींनी उजळला पाचोरा मतदारसंघ

पाचोरा । प्रतिनिधी
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी सायंकाळी मतदारसंघातील पाचोरा, भडगाव, नगरदेवळा आणि पिंपळगाव हरेश्वर या शहरांमधून महाविकास आघाडीच्या वतीने भव्य मशाल रॅली काढण्यात आल्या. याला मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून यातून यंदा येथे परिवर्तन होणारच अशी चर्चा रंगली आहे.

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या वतीने झंझावाती प्रचार फेर्‍यांचे आयोजन करण्यात आले असून याला मतदारांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाला सायंकाळी पाचोरा, भडगाव, नगरदेवळा आणि पिंपळगाव हरेश्वरमध्ये भव्य मशाल रॅली काढण्यात आली. यात प्रारंभी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मशाल रॅली निघाली. याप्रसंगी जोरदार जयघोषाने परिसर दणाणून निघाला. मशाल चिन्हावरच निवडणूक लढवत असलेल्या वैशालीताई सुर्यवंशी यांना जनता निवडून देणार असल्याची ग्वाही याप्रसंगी अनेक नागरिकांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...