Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजनपद्मभूषण ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन

पद्मभूषण ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांचे निधन झाले आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८५ वर्षांच्या होत्या…

- Advertisement -

कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारात त्या पारंगत होत्या. १९६६ साली त्यांनी मुंबईत नालंदा डान्स अँड रीसर्च सेन्टर आणि नालंदा नृत्यकला महाविद्यालयाची स्थापना केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शरद पवारांना समजायला १०० जन्म घ्यावे लागतील; राऊतांचा भाजपला सणसणीत टोला

गरीब घरातील नृत्यप्रेमी मुलींसाठी नृत्य शिकण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी या संस्थांचे शुल्कही कमी ठेवले होते. कनक रेळे यांना पद्मभूषण, कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमी अॅवॉर्ड, अशा अनेक पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या