Saturday, October 17, 2026
Homeदेश विदेशज्ञानेश कुमारांना पद्म भूषण पुरस्कार द्या; भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

ज्ञानेश कुमारांना पद्म भूषण पुरस्कार द्या; भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

कोलकाता | Kolkata
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमीक भट्टाचार्य यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालमध्ये मुक्त आणि शांततापूर्ण निवडणूक पार पाडण्यात ज्ञानेश कुमार यांची भूमिका असल्याचा दावा करत, त्यांना किमान पद्म भूषण पुरस्कार मिळायला हवा, असे भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.

भट्टाचार्य यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे, याच काळात विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात असून, त्यांच्या भूमिकेची चौकशी आणि पदावरून हटवण्याच्या मागण्या केल्या जात आहेत.

- Advertisement -

शमीक भट्टाचार्य नेमकं काय म्हणाले?
पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमीक भट्टाचार्य यांनी ज्ञानेश कुमार यांच्या कार्याचे समर्थन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया अधिक शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पडली. मतदार यादीतील मृत आणि कथित बनावट मतदारांची नावे वगळण्यासह पात्र मतदारांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यात ज्ञानेश कुमार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

भट्टाचार्य यांनी असा दावा केला की, पश्चिम बंगालमधील नागरिकांना दीर्घकाळापासून निवडणुकीपूर्वी, निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतरच्या हिंसाचारापासून मुक्त वातावरणात मतदान करण्याची अपेक्षा होती. त्यांच्या मते, ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली मतदार यादी अधिक अचूक करण्याचे काम झाले. याच पार्श्वभूमीवर “किमान पद्म भूषण तरी मिळायला हवा”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा अल्टिमेटम; या तारखेपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन

ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा
समिक भट्टाचार्य म्हणाले की, काँग्रेस पक्ष राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाही. असे असताना राहुल गांधींबद्दल काय बोलायचे? ज्ञानेश कुमार यांना किमान पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे. पश्चिम बंगालची जनता आनंदी आहे. मोठ्या कालावधीनंतर जनता भीती आणि दबावाच्या वातावरणातून मुक्त झाली आहेत. कोणत्याही हत्येच्या घटनेशिवाय पश्चिम बंगालमध्ये मतदान झाले आहे. पश्चिम बंगाल हे एक सीमावर्ती राज्य आहे, जिथे ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली मतदार यादीतून बांगलादेशी घुसखोरांना काढून टाकण्यात आले. पश्चिम बंगालमधील सामान्य जनतेचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे. येथील भाजपची इच्छा आहे की त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले जावे, असेही भट्टाचार्य म्हणाले.

विरोधकांचा हल्ला सुरूच
एसआयआरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांना धारेवर धरलं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू झाली आहेत. कॉकरोच जनता पार्टीनेही ज्ञानेश कुमार यांना अल्टिमेटम दिलेला असतानाच भाजपच्या नेत्याने त्यांचं समर्थन केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने ज्ञानेश कुमार यांची पोलखोल केली आहे. निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआरशी संबंधित निर्णयाला गेल्या 10 महिन्यात 14 वेळा हरकत घेतली होती. मात्र, तरीही एसआयआरशी संबंधित निर्णय परस्पर घेण्यात आले, असा दावा या वृत्तपत्राने केला आहे. म्हणजेच ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयोगात मनमानी सुरू होती, हे उघड झालं आहे.

ताज्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर २०२६ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) संध्याकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात...