Friday, September 25, 2026
Homeदेश विदेशज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा अल्टिमेटम; या तारखेपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा अल्टिमेटम; या तारखेपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली | New Delhi
दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आता निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास २ ऑक्टोबर, गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतून आंदोलनाला सुरुवात करू, अशी घोषणा CJPचे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक अभिजीत दिपके यांनी केली आहे. त्यानंतर हे आंदोलन देशातील इतर शहरांमध्ये नेण्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
CJPने गुरुवारी पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांत राजीनामा देण्याची मागणी केली होती. विशेष गहन मतदार यादी पुनरीक्षण म्हणजेच Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेत मतदारांच्या हक्कांशी संबंधित अनियमितता झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या मागणीसोबतच CJPने ‘Election Commission Thik Karo’ ही देशव्यापी मोहीम सुरू करण्याची घोषणा केली.

- Advertisement -

CJPचे म्हणणे आहे की, निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची जबाबदारी निवडणूक आयोगाने स्पष्ट करावी. मात्र, हे आरोप CJPचे असून त्यावर निवडणूक आयोगाची भूमिका स्वतंत्रपणे विचारात घेणे महत्त्वाचे आहे.

अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी, 25 सप्टेंबर रोजी ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली. ज्ञानेश कुमार यांनी उद्यापर्यंत राजीनामा दिला नाही, तर सीजेपी 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतून देशव्यापी विरोध प्रदर्शन सुरू करेल. हे आंदोलन देशभरातील शहरांमध्ये पसरेल या गांधी जयंतीला लोकशाही वाचवण्याचा संकल्प करूया, असं त्यांनी म्हटलं आहे.

Nashik News: वडील पोहत होते, मुलानेही पाण्यात उडी घेतली; काही क्षणांतच घडलं भयंकर, वाचून अंगावर काटा येईल!

३ कोटी मतदारांची नावे हटवली? दिपके यांचा गंभीर आरोप
दरम्यान, गुरुवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना दिपके म्हणाले, “ज्ञानेश कुमार हे देशाच्या लोकशाहीसाठी मोठा धोका आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यानंतर सरकार हे ठरवत आहे की कोणाला मतदान करू द्यायचे आणि कोणाला नाही. देशभर सुमारे १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे मतदार यादीतून हटवण्यात आली आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि विरोधकांमधील मतांचा फरक अवघा २ टक्के होता. अशा वेळी १३ कोटी नावे वगळणे हा सत्ताधाऱ्यांना राजकीय फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.”

48 तासांचा अल्टिमेटम
यापूर्वी 24 सप्टेंबर रोजी अभिजीत दीपके त्यांचे सहकारी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषद घेत ज्ञानेश कुमार यांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. यावेळी त्यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या.

  1. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू करावी.
  2. एसआयआर प्रक्रियेला स्थगिती देऊन जानेवारी 2025 ची मतदार यादी पुन्हा लागू करावी.
  3. 2023 चा कायदा रद्द करून निवडणूक आयोगात सुधारणा कराव्यात.

ताज्या बातम्या

कादवा

Nashik News: कादवा सहकारी साखर कारखान्याची उद्या 55 वी वार्षिक सर्वसाधारण...

0
ओझे | वार्ताहरकादवा सहकारी साखर कारखान्याची 55 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार , दि.26 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम...