Friday, April 24, 2026
Home Blog Page 13311

भुसावळ : हातात तलवार घेवून दहशत निर्माण करणारा पोलीसांच्या ताब्यात

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

भुसावळ (प्रतिनिधी) –

भुसावळ शहरात बस स्टॅण्ड परिसरातील रोडवर सार्व. जागी आज दि.४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक इसम हा हातात धारधार तलवार घेवुन दहशत निर्माण करीत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस

अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके, उप.वि.पो.अधिकारी गजानन राठोड, भुसावळ पो.नि.दिलीप भागवत भु.बा.पेठ पो.स्टे यांच्या मार्गदर्शना खाली भु.बा.पेठ पो.स्टेचे  पो.ना.रविंद्र बि-हाडे, पो.कॉ उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आश्यांनी लागलीच तेथे जावुन त्यास ताब्यात घेतले.

सर आरोपीचे नाव अजय ( ऊर्फ ) सोनु मोहन अवसरमल (वय-22) रा.राममंदिर चिंचाल, लालबाग, बुऱ्हाणपुर (मध्यप्रदेश) ह.मु.भारत नगर भुसावळ असे त्याने सांगितले. तसेच त्याजवळील एक लोखंडी तलवार जप्त केली. यापुर्वीही त्याचेवर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.

पेठरोडवर साडेचार लाखांचा गुटखा पकडला; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी 

अवैध गुटखा विक्रीच्या तयारीत असलेल्या वाहनावर शहरातील पेठरोडवरील दत्तनगर येथे आज दुपारी छापा टाकून साडेचार लाखाच्या गुटख्यासह 10 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल शहर पोलीसांनी जप्त केला आहे.  जैद सलाउद्दीन शेख(33, रा. निळकंठ अर्पा. पाथर्डीफाटा) व समीर नसरूद्दीन खान (22, रा. झिनीत नगर, वडाळा गाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक सचीन खैरनार व त्यांचे पथक गस्त घालत असताना पोलीस नाईक शांताराम महाले यांना खबर्‍याने पठेराडेवर अवैध गुटखा विक्रीच्या तयारीत पिकअप वाहन असल्याची माहिती दिली.

याबाबत वरिष्ठांना कळवल्यानंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ, सहायक निरिक्षक सचीन खैरनार, महेश कुलकर्णी, कर्मचारी पोपट कारवाळ, वसंत पांडव, प्रविण कोकाटे, येवाजी महाले, अनिल दिघोळे, असिफ तांबोळी, दिलीप मोंढे, विशाल काठे, मनोज डोंगरे यांच्या तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दत्तनगर येथे पाटाच्या बाजुला सापळा रचला होता.

निर्धारेत वेळत संशयित पिकअप वाहन येताच पथकाने छापा मारून तपासणी केली असता त्यामध्ये 3 लाख 60 हजार रूपयांचा आरबी रंगबाज पान मसाल्याच्या 3 हजार पाकिट (15 गोणी) तर बारबी झेड च्युंविंग टोबॅको तीन हजार पाकिट (15 गोण्या) असा मुद्देमाल आढळून आला.

तसेच 6 लाखाचे पिकअप वाहनही पोलीसांनी जप्त केले. असा एकुण 10 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

केडगावचे सराईत चोरटे गजाआड

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

एलसीबीची कारवाई । सावेडीतून चोरलेली कारही जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडीच्या बोरुडे मळ्यातून कार चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेले दोघे सराईत चोर निघाले. केडगावच्या दोघा चोरांना अटक करण्यात एलसीबी पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी या चोरट्यांकडून चोरी केलेली कारही जप्त केली आहे.

गणेश शिवाजी लोखंडे (रा. लोंढे मळा, केडगाव) आणि संकेत सुनील खापरे (रा. विनायकनगर) अशी अटक केेलेल्या दोघांची नावे आहेत. 25 नोव्हेंबरला बोरुडे मळ्यातून या दोघांनी स्वीफ्ट कार चोरी केली होती. चोरी केलेली कार घेऊन हे दोघे सुपा एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पोलीस पथकाने सुपा एमआयडीसी परिसरात सापळा लावला. कार दिसताच पोलिस पथकाने घेराव घालत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी ही कार बोरुडे मळ्यातून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कार जप्त केली.

औरंगाबाद येथील विजय प्रभाकर लटंगे यांची स्वीफ्ट कार (एम.एच.20,एजी-6758) या दोघांनी चोरी केली होती. त्यासदंर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातच करायचे चोर्‍या
गणेश लोखंडे विरोधात सहा तर संकेत खापरे विरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. हे दोघे शहरातच चोरी करत असल्याचे चौकशीत समोर आले. कोतवाली आणि तोफखाना या दोनच पोलीस ठाण्यात दोघांविरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. चोरीच्या आणखी काही गुन्ह्याची उकल या दोघांकडून होईल असे पोलिसांनी सांगितले.

नगर अर्बनच्या ठेवी व्याजदारात वाढ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर अर्बन बँकेने ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 1 डिसेंबरपासून लागू करण्यात आल्याची माहिती प्रशासकांनी दिली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठेवींवरील व्याजदर ठरविणेबाबत बँकांना स्वायत्तता दिलेली आहे. त्यानुसार नगर अर्बन को-ऑप बँकेच्या व्यवस्थापक समितीने 1 ते 2 वर्षासाठी ठेवीवरील व्याजदरात .25 टक्केने वाढ केली. 1 ते दोन वर्षावरील ठेवींना पूर्वी 8 टक्के दराने व्याजदर दिला जायचा तो आता 8.25 टक्के करण्यात आला आहे.

सुधारित व्याजदराची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून पासून नव्याने येणार्‍या व नूतनीकरण होणार्‍या ठेवींसाठी करण्यास सुरूवात झाली आहे. शतकोत्तर गौरवशाली परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेच्या सन्माननीय ठेवीदार व सभासदांनी उदंड प्रतिसाद देत बँकेवरील विश्वास वृद्धिंगत केलेला आहे. बँकेच्या दैनंदिन ठेवींमध्ये भरघोस वाढ होत आहे. आपल्या बँकेचे ठेवींवरील व्याजदर इतर बँकांच्या तुलनेने आकर्षक व अधिक फायद्याचे असून सर्व सन्माननीय ठेवीदार व सभासदांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक समितीने केले आहे .

सुधारीत व्याजदर
15 ते 90 दिवसांसाठी व्याजदर 4.25%
91 ते 180 दिवसांसाठी व्याजदर 5.00%
181 ते 364 दिवसांसाठी व्याजदर 8.00%
1 वर्ष ते 2 वर्षापर्यंत व्याजदर 8.25%
2 वर्ष ते 10 वर्षापर्यंत व्याजदर 7.75%
टॅक्स सेव्हिंग स्कीम – मुदत 5 वर्ष
(सर्वांसाठी एकच दर) व्याजदर 7.75%
जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक संघटना,
दिव्यांग व माजी सैनिकांना व्याजदर 0.50% अधिक
15 लाख व त्यापुढील रकमेस 0.25% अधिक

नगर: भिंगारचे पाणी दिल्लीत !

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

खासदार डॉ. सुजय विखेंनी उठविला संसदेत आवाज

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहराला मुबलक पाणी अन् शहराचाच भाग असलेल्या भिंगारमध्ये मात्र पाण्यासाठी वणवण. पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेल्या कॅन्टोंमेंट बोर्डही उडवाउडवीची उत्तरे देतात. खासदार डॉ. सुजय विखे यांना रविवारच्या बैठकीत ही बाब प्रकर्षाने जाणवली. आज त्यांनी भिंगारचा पाणी प्रश्‍न थेट दिल्लीतील संसदेत उपस्थित करत केंद्र सरकारने कॅन्टोंमेंट बोर्डाला आदेश करावेत अशी मागणी केली.

भिंगार हा नगर शहराचाच भाग. भिंगारकरांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ही कॅन्टोंन्मेंट बोर्डाची. गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अनियमीत पाणी पुरवठा केला जातो. कॅन्टोंन्मेंटचे अधिकारी आणि प्रशासनाकडे तक्रार केली तर ते समाधानकारक उत्तर देत नाहीत, असा तक्रारीचा पाढा त्रस्त भिंगारकरांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासमोर रविवारी मांडला.

भिंगारकरांच्या या तक्रारीमुळे खा. डॉ. विखे अस्वस्थ झाले. पाणी टंचाईने त्रस्त् नागरीकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याकडे लक्ष वेधत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा व प्रशासनास योग्य त्या सूचना द्यावी अशी खासदार डॉ. विखे यांनी लोकसभेत शुन्य प्रहारात केली.

भिंगार येथील रहिवाशी कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या अधिपत्याखाली येतात. तेथे कॅन्टोंन्मेंट बोर्ड व एमआयडीसी यांच्यात झालेल्या कराराद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र कॅन्टोंन्मेंट बोर्ड पाणी गळती, जुनी पापईपलाईन या कारणांकडे बोट दाखवुन रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. मुळात पाण्याची एकूण मागणी, त्याची विभागणी व पाणी रेशनिंग बाबत प्रशासनाने संधिग्ता बाळगली आहे. त्यामुळे एकीकडे नगर शहराला महापालिकेकडून मुळा धरणातून नियमित पाणी पुरवठा तर दुसरीकडे शहराचाच भाग असणार्‍या भिंगारमध्ये पाणी-बाणी अशी अभुतपुर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक रहिवाशांना कॅन्टोंन्मेंट प्रश्शसनाकडून कुठलीच माहिती व्यवस्थित दिली जात नसल्याची तक्रार दिवसोंदिवस वाढत आहे. नागरीकांचा रोष लक्षात घेता कॅन्टोंन्मेंट हे संरक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी यावेळी केली. रविवारीच खा. डॉ. सुजय विखे यांनी भिंगारच्या नागरीकांची बैठक घेऊन त्यांचा प्रश्नाबाबत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विखे यांनी थेट संसदेत आवाज उठविला.

कॅन्टोंमेंटकडून तुसडेपणा
सर्वात मोठा सुरक्षा व सैनिकी दलाचा एरिया अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भिंगार गाव आणि परिसरात आहे. अनेक वर्षांपासून तिथे असलेल्या संरक्षण विभागाद्वारे रहिवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतू मागील काही महिन्यांपासून ओढवलेल्या पाणी प्रश्नामुळे संरक्षण विभागातील अधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी जाणार्‍या रहिवाशांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने, केंद्र सरकारने मध्यस्थी करून हा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती खा. विखे पाटील यांनी केली.

पाणी गळती, जुनी पापईपलाईनच्या नावाखाली कॅन्टोंमेंट बोर्ड भिंगारकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. पाण्याची एकूण मागणी, त्याची विभागणी व पाणी रेशनिंग बाबत प्रशासनाने संधिग्ता बाळगल्याने भिंगारमध्ये पाणी प्रश्‍न निर्माण झाला आहे.
– खा. डॉ. सुजय विखे

शिक्षक भरतीमुळे ‘टीईटी’ला साडेतीन लाख अर्ज

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेसाठी राज्यातून डीटीएड, बीएडधारकांचा कल यंदा वाढला आहे. दोन्ही पेपरला 3 लाख 43 हजार 264 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘महाटीईटी’ 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात येणार आहे.

यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 8 ते 28 नोव्हेंबरदरम्यान करण्यात आली. प्राथमिक (पेपर-1), माध्यमिक (पेपर-2) अशा दोन स्तरावर डीटीएड, बीएडधारकांकडून अर्ज मागवण्यात आले असून यंदा मागील वर्षीच्या तुलनेत अर्जांची संख्या वाढली आहे. मुदतवाढीच्या मागणीला नकार देण्यात आला. ऑनलाईन अर्ज भरलेल्या 3 लाख 43 हजार 264 पैकी सर्वाधिक अर्ज प्राथमिक स्तरासाठी (पेपर-1) आलेले आहेत. पेपर-1 साठी 1 लाख 88 हजार 678 तर पेपर-2 साठी 1 लाख 54 हजार 586 अर्ज आले आहेत.

राज्यात शिक्षक भरतीसाठी डिसेंबर 2013 पासून ‘टीईटी’ बंधनकारक करण्यात आली आहे. एका वर्षात दोन परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले परंतु तसे झाले नाही. शिवाय 2010 पासून शिक्षक भरती रखडल्याने परीक्षेकडे कल कमी राहिला. तीन वर्षांपूर्वी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला अडचणीत सापडलेली ही प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी मार्गी लागली.

पहिल्या टप्प्यात 5822 उमेदवारांची निवड यादी झाली. मागील महिन्यात ‘टीईटी’ परीक्षेचे वेळापत्रक आले. नऊ वर्षांनंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाल्याने ‘टीईटी’कडे कल वाढल्याचे दिसते. गेल्यावर्षी पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेने दिली.

आम्हाला महाराष्ट्राची काळजी; सुरु प्रकल्प बंद करणार नाही – जयंत पाटील

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई  | प्रतिनिधी

आम्हाला महाराष्ट्राची काळजी आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीची काळजी आहे.जे प्रकल्प सुरू आहे ते प्रकल्प बंद करणार नाही पण काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेतले जातील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत आम्ही सगळी माहिती घेत आहोत. आम्हाला शेतकऱ्यांना ठोस मदत करायची आहे. घोषणा करायची आणि काम करायचे नाही अशी आमची वृत्ती नाही.

योग्य वेळी योग्य निर्णय घेवू असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राची तिजोरी कुणी कशी खाली केली याबाबत माहिती घेवू असे सांगतानाच ४० हजार कोटी रुपयांबाबत खासदारांनी वक्तव्य केल्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

भिमा कोरेगाव प्रकरणावर बोलताना आमचे सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. कोणते गुन्हे गंभीर आहे. कोणत्या गुन्हयामध्ये जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना गुंतवले गेले याची माहिती घेतली जाईल. सगळ्याच गोष्टींचा विचार करून निर्णय घेतले जातील असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

अजून खातेवाटपाबाबतचा निर्णय झाला नाही. त्यामुळे मी कुणाला पाठिशी घालतोय असा प्रश्नच उद्भवत नाही. गुन्हे आहेत त्यांना सरकार धडा शिकवेल. गैरसमज पसरवू नये. सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचे आहेत असेही जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना सांगितले.

आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे त्यामुळे मदत देण्यासाठी समान धोरण राबवू. आम्ही पक्ष बघून निर्णय घेणार नाही. ज्याला आवश्यक असेल त्याला आढावा करून मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना मदत करणे आमचे प्राधान्य राहिल असेही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील पर्यटनवृद्धीसाठी कोलकत्ता येथे भव्य रोड शो

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई | प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील पर्यटनाच्या प्रसिद्धीसाठी राज्याच्या पर्यटन संचालनालयाच्यावतीने कोलकत्ता येथे नुकतेच भव्य अशा रोड शोचे आयोजन करण्यात आले. या रोड शोच्या माध्यमातून तेथील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. महाराष्ट्राचा समृद्ध पर्यटन वारसा तिथे सादर करण्यात आला.

रोडशोला पर्यटन संचालक दिलीप गावडे, औरंगाबाद विभागीय पर्यटन उपसंचालक श्रीमंत हरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटनावर आधारित सादरीकरण, बी टू बी चर्चासत्रे व प्रश्नोत्तरे तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. पर्यटकांनी महाराष्ट्रातील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.

पर्यटनाशी निगडीत सुमारे ८० व्यवसायिक, सहल आयोजक व नामांकीत ट्रॅव्हल एजन्ट यांच्यासमवेत चर्चा करुन त्यांना महाराष्ट्रातील पर्यटन संधींची माहिती देण्यात आली.

पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले की, महाराष्ट्राला प्राचीन, सांस्कृतिक आणि नैसर्गिक असा फार मोठा पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे. राज्यातील पर्यटनाला विकासाच्या दिशेने नेताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम पर्यटन संचालनालयाच्यावतीने राबविण्यात येतात. राज्यात समुद्र किनारा, किल्ले, लेण्या, गुंफा अशी बरीच पर्यटनस्थळे आहेत. या सर्व पर्यटनस्थळांची माहिती देश-विदेशातील पर्यटकांना व्हावी व त्यांनी या स्थळांना भेट देऊन त्याचा आनंद घ्यावा यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणजे देशांतर्गत रोड शोचे आयोजन केले जाते. कोलकत्ता येथे झालेल्या रोड शोला चांगला प्रतिसाद लाभला. पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट देण्यासाठी मोठा रस दाखवला.

          देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटकांना, सहल आयोजकांना व पर्यटन व्यवसायिकांना राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणे, पर्यटनाशी निगडीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, पारंपरिक कला- संस्कृती, हस्तकला, पाककृती आदींची ओळख करून देणे व त्यांच्याशी व्यवसायिक संबंध वृद्धिंगत करून विविध राज्यातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करणे हा रोड शोचा मुख्य उद्देश होता, असे पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले.

जळगाव : ‘नही’च्या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; नशिराबाद ग्रा.पं.चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नशिराबाद, ता.जळगाव । वार्ताहर

महामार्ग क्र. 6 वर जळगाव-नशिराबाद दरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठी जिवघेणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे आजपर्यंत अनकजणांचे प्राण गेले असून आज दि.4 रोजी दूरदर्शन टॉवर समोर झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सुध्दा खड्ड्यांमुळेच घडली असून सदर खड्डे यापुर्वी बुजले असते तर आजची ही दुर्घटना टळली असती. त्यामुळे या महिलेच्या मृत्यूस राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधीकरण विभाग जबाबदार असल्याने संबंधीतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन नशिराबाद ग्रा.पं.सरपंच विकास पाटील व पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

महामार्गावरील खड्डे बुजण्या संदर्भात माजी सरपंच पंकज महाजन यांनी दि.22 नोव्हेंबर रोजी प्रकल्प निर्देशक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग जळगाव यांना दिले होते. या निवेदनात भुसावळ-जळगाव दरम्यान महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याचे लक्षात आणून दिले होते व ते खड्डे तत्काळ बुजण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली होती व खड्डे न बुजल्यास होणार्‍या अपघातांना संबंधीत विभाग जबाबदार असेल असेही नमूद केले होते.

महामार्ग दुरूस्तीसाठी नशिराबाद ग्रामपंचायत व माजी सरपंच पंकज महाजन यांचेसह ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी वेळोवेळी संबंधीत विभागाला लेखी, तोंडी सांगूनही अद्याप त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. तरी संबंधीत विभागाने याकडे लक्ष देवून महामार्गावरील खड्डे तत्काळ बुजण्यात यावेत व होणारे अपघात टाळावेत अशी मागणी होत आहे.

भुसावळ : फेकरी येथे रेल्वे अधिकार्‍याची रेल्वेखाली आत्महत्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

फेकरी, ता.भुसावळ (वार्ताहर)- 

येथील रेल्वे डाऊन लाईनवरील रेल्वे खांबा कि.मी. ४४९ एङ्ग८ जवळ दि.४ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भुसावळ येथील डिआरएम कार्यालयातील कंट्रोल रूम मधील अधिकारी वैभव आत्माराम लभाणे (वय ३२, मुळ रा.संतोषीमाता वार्ड नं. २३, बलकरंगा, चंद्रपूर. ह.मु. राममंदिर वार्ड, एलआयसी ऑङ्गिस जवळ भुसावळ) यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही. घटनेचे वृत्त कळताच फेकरीचे पोलिस पाटील किशोर बोरोले यांनी तालुका पोलिस ठाणे व रेल्वे आरपीएफ यांना खबर दिली.

त्यावरून रेल्वेचे अधिकारी  सिनिअर डिओएम को, सिनिअर डिओएम एचडब्ल्यु, सिनिअर डिएन यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली.

मयत व्यक्तीची स्कुटी रेल्वे लाईनच्या बाजूला जुन्या साकरी रोडवर लावलेली आढळली. मयत इसमाची ओळख त्याच्या खिशातून मिळालेल्या कागदपत्रांमुळे झाली. तपास तालुका पो.स्टे.चे पोनि रामकृष्ण कुंभार  यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉं प्रेम सपकाळे व त्यांचे सहकारी करित आहेत.