Wednesday, June 10, 2026
Home Blog Page 13369

जळगावच्या अनिमा ठरणार तिसर्‍या भारतीय अंतराळ वीरांगना

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव  – 

जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे तिसर्‍या भारतीय ‘अंतराळ वीरांगना’ ठरणार आहेत. नासामध्ये  विविध प्रकल्पांवर काम करीत असताना अनिमा पाटील यांची अंतराळवीर शास्त्रज्ञ उमेदवार म्हणून प्रोजेक्ट झेडडणच् ( Polar Suborbital Science in the Upper Mesosphere) ) अर्थात अवकाशातील वातावरणाचा अभ्यास करणार्‍या शैक्षणिक कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.

अंतराळ वीरांगना कल्पना चावला किंवा मूळ भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स या भारतीय महिलांच्या कामगिरीचा आपणा सर्वांनाच अभिमान आहे. अशाच आणखी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन अंतराळात झेप घेण्याचं कठीण ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे जळगावच्या अनिमा पाटील-साबळे!  सध्या त्या नासा या जागितक संस्थेत एम्स रिसर्च सेंटरच्या इंटेलिजन्ट सिस्टिम विभागात काम करीत आहेत. यापूर्वी त्यांनी केप्लर मिशन मोहिमेत चीफ इंजिनिअर म्हणून साडेतीन वर्षे काम केले आहे.

भारतीय वायुदलाची परीक्षा देण्यासाठी अर्जही आणला. दुर्दैवाने दृष्टिदोषामुळे त्यांचा पहिला प्रयत्न वाया गेला. तरीही हताश न होता संगणक ज्ञानाच्या माध्यमातून वेगळा प्रयत्न करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एमसीएफ पदवी मिळविली. त्या जोरावर मुंबईतील मायक्रोटेक्नॉलॉजी या कंपनीत नोकरीची संधी मिळवली.

दोन वर्षांच्या अनुभवानंतर अमेरिकेतील मेलस्टार कंपनीकडून त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे आले, खूप आनंद झाला. अमेरिकेत गेल्यावर सर्वांत आधी नासाचे स्पेस सेंटर पाहिले.कॅलिफोर्नियातील सॅन ओजे विद्यापीठात एरोस्पेस इंजिनिअरिंग विषय घेऊन एमएसचे शिक्षण घेण्याचा निर्धार केला.

त्यामुळे नासामध्ये प्रवेश मिळविण्याचा मार्ग दृष्टिक्षेपात आल्यासारखा वाटू लागला. 2012 मध्ये नासाकडून बोलावणे आले आणि केपलर मिशनमध्ये सीनिअर प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्याची मोठी जबाबदारी चालून आली, असे अनिमा पाटील यांनी सांगितले.

नासात काम करण्यासाठी अमेरिकी नागरिकत्वाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अनिमा यांनी अमेरिकी नागरिकत्वही स्वीकारलं आहे. अनिमा यांचे वडील मधुकर पाटील व आई नीता पाटील यांच्या मार्गदर्शनामुळेच त्यांना ही वाटचाल करणे शक्य झाले तसेच त्यांचे पती दिनेश हे अमेरिकेतच सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.

मुलं झाल्यानंतर सेकंड मास्टर्स करताना माझ्या घरच्यांचा मला विरोध झाला. मात्र आज सगळ्यांचा पाठिंबा मला मिळतो आहे त्या सांगतात.त्यांची अवकाशातील वातावरणाचा अभ्यास करणार्‍या शैक्षणिक कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. नासाच्या उड्डाण संधी कार्यक्रमाद्वारे हा प्रोजेक्ट राबवला जातो.

पाच दिवसाच्या या प्रशिक्षणादरम्यान फ्लोरिडा डैटोनाच्या अ‍ॅमरे रिडल अ‍ॅरोनॅटीकल युनिवर्सिटी कॅम्पसमध्ये अनिमाने हवाई प्रात्यक्षिकं हाय-जी आणि झिरो-जी विमान उड्डाणांचे प्रशिक्षण घेतले.

कोळपेवाडीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा तरूण गजाआड

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर, कोळपेवाडी (वार्ताहर) – कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी सुरेगाव येथील विद्यालयातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीला शाळा सुटल्यानंतर दुचाकीवर बसवून एका फार्म हाऊसवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी अमोल अशोक निमसे याला सिन्नर तालुक्यात गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शुक्रवारी सायंकाळी 4.40 वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आपापल्या घरी गेले. बहुतांशी विद्यार्थ्यांना त्यांचे पालक घेण्यासाठी येत असतात. अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला वडील नियमितपणे शाळेतून घेण्यासाठी येत असत. मात्र शुक्रवारी ते परगावी गेल्यामुळे त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना या विद्यार्थिनीस शाळेतून आणण्यास सांगितले. मात्र नातेवाईकांना शाळेत येण्यास थोडा उशीर झाला. सायंकाळी 5.15 मिनिटांनी ते शाळेत आले.

त्यावेळी त्यांना सदर मुलगी विद्यालयात नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मुलीच्या वर्गशिक्षकांशी संपर्क केला असता शाळा सुटून अर्धा तास झाला असून तुमची मुलगी शाळा सुटल्यानंतर ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी असेल असे सांगितले. परंतु मुलगी त्या ठिकाणी नव्हती. नातेवाईकाने मुलीच्या घरी चौकशी केली. मात्र ती घरी आली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शाळेत आले. त्यांनी शोध घेतला. मात्र ती आढळून न आल्याने मुलीचे अपहरण झाले असल्याची शंका आल्यामुळे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

या मुलीबाबत माहिती घेतली असता ही मुलगी निळा शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या गाडीवर बसून गेल्याची माहिती समजली. सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी शाळेचे विद्यार्थी व सदरची विद्यार्थिनी ज्या रस्त्याने घरी जाते त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलेे. यामध्ये कोळपेवाडी-सुरेगाव रस्त्यावरील हॉटेल आनंदचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मुलगी निळा शर्ट घातलेल्या आरोपीने त्याच्या मोटारसायकलवर पुढे बसवून घेवून जात असल्याचे दिसून आले.

त्यानंतर डॉ. बाळासाहेब जुंधारे व जगदाळे कलेक्शनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची गाडी मोतीनगर सुरेगावच्या दिशेने जातांना दिसून आली. त्यानंतर प्रमोद दंडवते यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी शिर्डी-लासलगाव रोडने शहाजापूरकडे जातांना दिसले. पोलिसांनी व शिक्षकांनी रात्रभर तपास करून देखील मुलगी मिळून आली नाही.

दुसर्‍या दिवशी शनिवारी सकाळी मोतीनगर सुरेगाव येथे सदर मुलीच्या नातेवाईकाच्या घरी या मुलीला सोडून देण्यात आले. पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेवून वैद्यकीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात गाठले. त्यावेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. शनिवारी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे मुलीच्या शोध घेण्यासाठी शहाजापूर शिवारात गेले असता त्यांना शिवाजी बोरसे यांच्या फार्म हाऊसवर हिरो होंडा कंपनीची गाडी (एम. एच. 41-3033) चावीसह मिळून आली.

गाडीच्या नंबरवरून गाडी मालकाची ओळख पटल्यानंतर त्यांनी आपली गाडी अमोल अशोक निमसे याला दिली असल्याचे सांगितले. एका महिलेने फार्म हाऊसवर शाळेचे दफ्तर आणि जेवणाचा डबा असून सकाळी 6 वाजेच्या दरम्यान आरोपी व मुलीला जातांना पाहिले असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी पोलिसांना अत्याचार झाले असल्याचे पुरावे आढळून आले.
मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व कोपरगाव पोलीस पथकाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडंगळी येथून अखेर काल मंगळवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आरोपी अमोल निमसेचा शोध घेत अखेर त्याला सिन्नर तालुक्यातील वडगंळीतील एका तांड्यावर पोलिस उपनिरीक्षक पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी बेड्या ठोकल्या.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी 

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं आज  वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं.दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेलं योगदान अतिशय मोठं होतं. रंगभूमीवरही त्यांनी केलेली अनेक नाटकं प्रचंड गाजली होती.

श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू असे त्यांच्या वडिलांचे तर सत्यभामा लागू त्यांच्या आईचे नाव होते. प्रारंभीचे त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, आणि त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.

कॉलेज जीवनापासून लागू यांना कलेची आवड निर्माण झाली. वैद्याकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच श्रीराम लागू यांनी नाटकात काम करण्यास सुरूवात केली.

पाथर्डी : नांदूर निंबादैत्य येथे गोळ्या झाडून सरपंचाची हत्या ; राजकीय वादातून घटना

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) –  तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदूर निंबादैत्य या गावात राजकीय वादातून दोन गटांत झालेल्या गोळीबारात सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. मंगळवार दि. 17 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेतील जखमींना अत्यवस्थ अवस्थेत नगरला उपचारासाठी हलविण्यात आले असून या घटनेत ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (वय 30) हे गंभीर जखमी झाले आहेत. भीमराज जिजाबा दहिफळे (वय 60), सदाशिव अर्जुन दहिफळे (वय 50) हे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

यासंदर्भात समजलेली माहिती अशी, की या घटनेतील मृत सरपंच संजय दहिफळे यांचे गावातीलच निवृत्त जवान शहादेव उर्फ पम्प्या पंढरीनाथ दहिफळे यांच्याशी राजकीय वैर होते. या दोघांमध्ये पूर्वी अनेकदा वाद झाले होते. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातीलच स्व. गोपीनाथ मुंडे चौकात दोन्ही गटांत मारामारी झाली. त्यात शहादेव दहिफळे यांनी आपल्याकडे असलेल्या रिवॉल्व्हरमधून सरपंच संजय दहिफळे यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या.

यावेळी झालेल्या मारामारीत सरपंच संजय दहिफळे यांच्या गटाचे ज्ञानेश्वर दहिफळे यांच्या डोक्याला जबर मार लागला तर भीमराज दहिफळे व सदाशिव दहिफळे यांना किरकोळ मार लागला. सर्व जखमींना गावातीलच काही तरुणांनी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता मोठी गर्दी जमा झाली होती.

वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद गर्जे यांनी संजय दहिफळे व ज्ञानेश्वर दहिफळे यांच्यावर प्रथमोचार करून अत्यवस्थ अवस्थेत नगरला पुढील उपचारासाठी पाठवले. दरम्यान सरपंच संजय दहिफळे यांचा मृत्यू झाला. या घटनेने निंबादैत्य नांदूर येथे तणावपूर्ण वातावरण असून घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी घटनास्थळी दाखल झाले. आरोपीस रात्री उशीरापर्यंत अटक केली नव्हती.

आडवाडी येथे बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी
शेनीत | त्र्यंबक जाधव
ठाणगावजवळील आडवाडी खालची येथे बिबट्याने भरदिवसा गाईवर हल्ला करुन गायीला ठार केल्याची घडना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.आडवाडी खालची येथील तुकाराम बहिरु बिन्नर हे आपल्या घरासमोर जनावरे चरत असताना बिबट्याने चारच्या सुमारास गाईचा फडशा पाडला. तुकाराम बिन्नर यांच्या मुलाने बिबट्याला पळविण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु बिबट्याने त्यांच्या आवाजाला दाद दिली नाही.
बिबट्याने गायीचा पूर्ण फडशा पाडल्यानंतरच त्या ठिकाणाहून पलायन केले. बिबट्याने जनावरांच्या कळपावर अचानक हाल्ला केल्याने कळपातील जनावरे बिबट्याच्या भीतीपोटी सैरावैरा पळत होती. आपल्या डोळ्यांदेखत बिबट्याने गाईचा फडशा पाडला असल्याने बिन्नर कुंटूब या हल्ल्यामुळे पूर्णपणे घाबरलेले आहे. वनविभागाच्यावतीने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा आशी मागणी ग्रामस्थाच्यावतीने करण्यात येत आहे.ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील आडवाडी खालची येथे बिबट्याने भरदिवसा गाईवर हल्ला करुन गायीला ठार केल्याची घडना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
आडवाडी खालची येथील तुकाराम बहिरु बिन्नर हे आपल्या घरासमोर जनावरे चरत असताना बिबट्याने चारच्या सुमारास गाईचा फडशा पाडला. तुकाराम बिन्नर यांच्या मुलाने बिबट्याला पळविण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु बिबट्याने त्यांच्या आवाजाला दाद दिली नाही. बिबट्याने गायीचा पूर्ण फडशा पाडल्यानंतरच त्याठिकाणाहून पलायन केले. बिबट्याने जनावरांच्या कळपावर अचानक हाल्ला केल्याने कळपातील जनावरे बिबट्याच्या भीतीपोटी सैरावैरा पळत होती. आपल्या डोळ्यांदेखत बिबट्याने गाईचा फडशा पाडला असल्याने बिन्नर कुंटूब या हल्ल्यामुळे पूर्णपणे घाबरलेले आहे. वनविभागाच्यावतीने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा आशी मागणी ग्रामस्थाच्यावतीने करण्यात येत आहे.

बंधारे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नंदुरबार – 

नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.समीर सतीष  गावित असे मयत विद्यार्थ्यांचे नाव असून तो पारकोटी येथील मुळचा रहिवासी आहे.

आज सकाळी सतीष हा डोक्यावर पडल्यानंतर त्याला उपचारार्थ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला मृत घोषीत करण्यात आले. यानंतर संतप्त पालक  विद्यार्थ्यांच्या मृतदेहासह आश्रमशाळेत दाखल झाले.

शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यु झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रशासनाच्या समजुतीनंतर विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या गावी रवाना करण्यात आला. बंधारे शासकीय आश्रमशाळेत अद्यापही तणावाचे वातावरण आहे.

जाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

माजी आमदार जे. पी. गावित यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

हतगड | लक्ष्मण पवार

दिनांक १७ डिसेंबर २०१९ रोजी कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार जिवा पांडू गावित यांचा ७१वा वाढदिवस साधेपणे पण मोठया उत्सहात साजरा करण्यात आला. ३५ वर्ष आमदार असूनही आमदार जिवा पांडू गावित स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा करीत नाही. तरी सकाळ पासूनच कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणात अलंगुन येथील निवासस्थानी येऊन साहेबाना शुभेच्छा दिल्या.

गावितांनी स्थापन केलेल्या आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ, अलंगुन या शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेत मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अलंगुन येथील आश्रमशाळेत निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आली तर शाहिद भगतशिंग विद्यालयातही विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

रांगोळी व काव्य वाचन स्पर्धेसाठी प्रा. आर. एच. गांगुर्डे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सर्व युनिटचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू भगिनी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.रात्री मुलांना भोजन देण्यात आले.

जाणून घ्या नगर जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिवस्मारक घोटाळ्यातून भाजपाचा अनैतिक चेहरा कॅगने केला उघड: सचिन सावंत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

प्रशासकीय मान्यता नसतानाही पंतप्रधान मोदींनी जलपूजन कसे केले?

विनायक मेटेंच्या कार्यक्रमात एका व्यक्तीचा झालेला मृत्यू झाकण्यासाठीच सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचे कारस्थान- सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मुंबई :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करायचा आणि मतांच्या राजकारणासाठी जनतेच्या भावनांशी खेळणा-या भाजपचा अनैतिक चेहरा कॅगने उघड पाडला असून मेटेंच्या कार्यक्रमात एका व्यक्तीचा झालेला मृत्यू झाकण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येऊ नये या उद्देशानेच फडणवीस सरकारने शिवस्मारकाकरिता सुधारित प्रशासकीय मान्यता देत आहोत असे दाखवण्याचे कारस्थान केले हे कॅगच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक २४ डिसेंबर २०१६ रोजी शिवस्मारकाचे जलपूजन केले होते. त्यानंतर पुन्हा २४ ऑक्टोबर २०१८ रोजी शिवस्मारक प्रकल्पाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाचे भूमीपूजन करताना बोट उलटल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. एकाच प्रकल्पाचे दोन दोन वेळा पूजन करताना या प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता नव्हत हे कॅगच्या अहवालातून उघड झाले आहे. प्रशासकीय मान्यतेशिवाय संपूर्ण प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न पूर्णपणे बेकायदेशीर होता हे स्पष्ट झाले आहे.

मेटे यांच्या भूमीपूजनावेळी झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा झालेला मृत्यू अंगाशी येईल आणि मोदी अडचणीत येतील हे पाहून डिसेंबर २०१८ मध्ये फडणवीस सरकारने ३६४३.७८ कोटी रुपये प्रकल्प किंमत निर्धारित करुन सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. ही सुधारित प्रशासकीय मान्यता देताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असताना ९.७५ कोटी रुपये मंजूर करुन २८ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती असे गृहीत धरले गेले.

कॅगने फडणवीस सरकारचे हे गृहीतक चूकीचे ठरवले असून आघाडी सरकारने शिवस्मारक प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली नव्हती असा निर्वाळा दिला आहे. आघाडी सरकारने केवळ प्रकल्पासंदर्भात चाचपणी व सर्वेक्षण तसेच स्पर्धात्मक आरेखन तसेच जागतिक दर्जाच्या रचनाकारांकडून प्रकल्पाचे आरेखन मागवण्यासाठी ९.७५ कोटी मंजूर केले होते असे अहवालात म्हटले आहे.

यातूनच प्रकल्पाला प्रशासकीय मान्यताही नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनैतिक पध्दतीने जनभावनेशी खेळण्याकरिता व केवळ मतांसाठी जलपूजन केले हे उघड तर झालेच आहे पण अशा प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा घाट घालून एका व्यक्तीचा बळी गेला याबद्दल दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. फडणवीस सरकारने या दुर्घटनेची चौकशी जाहीर केली होती त्याचे काय झाले हे कळले नाही असे सावंत म्हणाले.