Tuesday, June 16, 2026
Home Blog Page 13387

125 शिक्षक संकटात

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी
  • बीएड, पदवी पूर्ण करणार्‍या 125 शिक्षकांना नोटीस
  • रजेच्या कालावधीबाबत मागवणार अधिकृत पुरावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापन करत असताना एकाचवेळी बीएड आणि पदवीचे शिक्षण कसे पूर्ण केले, याबाबत संशय व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना नोटीस काढून त्यांच्याकडून रजेच्या कालावधीचा अधिकृत पुरावाच मागितला आहे. या 125 शिक्षकांना एकतर शाळेत अध्यापन केलेलेे असेल अन्यथा शाळेत सुट्टी टाकून महाविद्यालयात हजेरी लावलेली असेल, या दोन्ही प्रकारांत तफावत असणार्‍या शिक्षकांवर फसवणूक अथवा खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी कारवाईची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत झालेल्या चर्चेनुसार प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यात कार्यरत असणार्‍या प्राथमिक शिक्षकांची बीएड आणि पदवीची माहिती संकलित केली आहे. यात संबंधीत शिक्षक एकतर बाहेरून बहिस्थ पध्दतीने महाविद्यालयात प्रवेश घेवून उन्हाळ्याची सुट्टी अथवा नियमित पध्दतीने महाविद्यालयात प्रवेश घेवून त्या ठिकाणी असणार्‍या 70 ते 80 टक्के हजेरी लावून बीएड अथवा पदवीचे शिक्षण पूर्ण केले असेल मात्र, हे करत असताना त्यांनी नियमित महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असल्यास त्यांनी संबंधीत शाळेत सुट्टी टाकलेली असणार. एकाच वेळी दोन्ही काम संबंधीत शिक्षक करू शकणार नाहीत.

मात्र, जिल्ह्यात असा प्रकार घडल्याच्या सशंय शिक्षण विभागाला आहे. यामुळे त्यांनी सेवेत असणार्‍या शिक्षकांनी कोणत्या कालावधीत बीएड् आणि पदवी घेतली आणि त्या काळात ते रजेवर होते की नाही, याची माहिती घेतली आहे. यात 133 शिक्षकांनी नियमितपणे बीएड आणि पदवी पूर्ण केलेली आहे. तर 125 शिक्षकांबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाला संशय आहे. यासह 3 शिक्षकांनी रजा न घेता, तर 5 शिक्षकांच्या रजेच्या कालावधीत अनियमिता आढळली आहे.

आता शिक्षण विभागाने या शिक्षकांना नोटीस काढण्याचा निर्णय घेतला असून गटशिक्षणाधिकारी पातळीवरून या शिक्षकांना नोटीस देण्यात येणार असून तालुका पातळीवर त्यांच्या शाळेतील गैरहजेरी आणि बीएड आणि पदवीचे पूर्ण केलेल्या शिक्षणाचा कालावधीत तपासण्यात येणार आहेत. त्यात दोषी आढळणार्‍यांवर कडक करावाई करण्यात येणार आहेत. यात दोषी आढळणार्‍या संबंधीत शिक्षकांना बीएड आणि पदवीच्या जोरावर घेतलेल्या फायद्याला मुकण्याची शक्यता आहे.

21 डिसेंबरपासून विद्यमान पदाधिकारी ठरणार ‘काळजीवाहू’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जिल्हा परिषद : धोरणात्मक निर्णय घेण्यावर येणार बंधने

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांची मुदत येत्या 20 डिसेंबरला संपुष्टात येत आहे. त्यानंतर त्यांना घटनात्मकदृष्ट्या पदावर राहता येणार नसले तरी तांत्रिक कारणामुळे या पदाधिकार्‍यांना काळजीवाहू स्वरूपात जिल्हा परिषदेत पुढील पदाधिकारी निवडीपर्यंत काम करावे लागणार आहे. नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडीनंतर या विद्यमान पदाधिकार्‍यांना पदभार सोडावा लागणार असून दरम्यानच्या काळात कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचे राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाल सप्टेंबर महिन्यांत संपला होता. मात्र, त्यावेळी विधानसभा निवडीच्या कारणामुळे या पदाधिकार्‍यांना 120 दिवसांची मुदत वाढ मिळाली. मिळालेली मुदत वाढही 20 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे नूतन पदाधिकर्‍यांच्या निवडी करण्याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकार्‍यांना कळवले आहे. 20 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने त्यानंतर प्रचलित पद्धतीने या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान नूतन पदाधिकारी निवडीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद सदस्यांना दि. 21 डिसेंबर रोजी नोटीस पाठवून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या सभेस उपस्थित राहण्याबाबत कळवले जाणार असल्याचे संकेत आहे. नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रमसाठी नोटीस पाठवल्यानंतर किमान 7 ते 10 चा राहणार असून त्यानंतर निवडीसाठी सभा घेण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यानुसार ही सभा 31 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.काही कारणास्तव हा कालावधी पुढे ढकलण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला आहे. मात्र, 20 डिसेंबर ते पुढे पदाधिकारी निवड सभा होवून नवीन पदाधिकारी निवडीसाठी आवश्यक असणार्‍या कालावधीत जिल्हा परिषदेचा पदभार हा काळजीवाहू स्वरूपात जुन्याच पदाधिकार्‍यांच्या हातहात राहणार आहे.

जिल्हा परिषद पदाधिकाजयांचा कालावधी 20 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यानंतर या पदाधिकारी निवडीबाबत प्रक्रिया करण्याचे ग्रामविकास विभागाचे आदेश आहेत. त्याप्रमाणे 20 डिसेंबरनंतर निवडणूक कार्यक्रम घेतला जाईल. जिल्हा प्रशासन स्तरावर यापेक्षा अधिक काहीच सांगता येत नाही. काही बाबी या शासनाचे धोरण असतात. त्यावर शासनच निर्णय घेईल.
-राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांचा कालावधी संपल्यानंतर लगेच नविन पदाधिकारी निवडीसाठी प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमण्याची आवश्यकता नाही. सध्याचे विद्यमान पदाधिकारी नवीन पदाधिकर्‍यांच्या निवडीपर्यंत कामकाज पाहू शकतात. मात्र, त्यांनी त्या काळात धोरणात्मक निर्णय घेवू नयेत.
– असीम गुप्ता, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग.

सामोपचार परतफेड निर्णय पतसंस्थांना बंधनकारक करावा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

थकित कर्जदारांची सहकार आयुक्तांकडे मागणी

पारनेर (तालुका प्रतिनिधी)- राज्यातील सहकारी संस्थांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी सामोपचार कर्ज परतफेड योजना शासनाने जाहीर केलेली आहे. सर्व पतसंस्थांना ती स्वीकारणे बंधनकारक करावे अशी मागणी पतसंस्था कर्जदारांनी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे केली आहे.

राज्यातील अनेक पतसंस्थांतील थकीत कर्ज वाढत गेल्यामुळे संस्था अडचणीत येऊ लागल्यावर ठेकेदारांकडूनही ठेवी काढण्याची मागणी वाढली. यामुळे पतसंस्था चळवळ सन 2007 मध्ये धोक्यात आल्याचे लक्षात येताच व पुढे त्यामधून मार्ग काढण्यासाठी सहकार खात्याने तत्कालीन सरकारकडे या सामोपचार योजनेची शिफारस केल्यानंतर 27 सप्टेंबर 2007 रोजी या योजनेला मान्यता दिली होती. पुढे दहा वेळा या योजनेला शासनाने मुदतवाढ देत अंतिम मुदत व 6 जून 2018 रोजी घेऊन 31 मार्च 2020 अखेर या योजनेचा लाभ पतसंस्थांच्या थकीत कर्जदारांना मिळू शकतो असे जाहीर केले आहे.

मी ऑगस्ट 2016 पतसंस्थेकडून चार लाखांचे कर्ज दहा वर्षाच्या परतफेडीवर घेतलेले होते व आजपर्यंत चार लाख पाच हजार रुपये परतफेड केलेली आहे.तरीही मला माझे कर्जखाते पावणेतीन लाखांनी दाखवत कारवाई केली आहे. सामोपचार कर्ज परतफेडीचा पतसंस्था स्वीकार करत नाही. या शासन निर्णयात तात्काळ दुरुस्ती करून तो सर्व पतसंस्थांना बंधनकारक करावा. सहकार खात्याकडे याविषयी माहिती मागवली असून माहिती मिळताच याबाबत थकीत कर्जदारांना संघटित करून न्यायालयात दाद मागण्याचा विचार आहे.
– रामदास घावटे – पतसंस्था कर्जदार जवळे , ता.पारनेर

घेतलेले कर्ज परतफेड करून कर्जमुक्त होण्याची माझी इच्छा आहे, परंतु आम्ही चार वर्षांपूर्वी घेतलेल्या कर्जाच्या दुपटीहून अधिक रकमेची मागणी संस्था करत आहे. सामोपचार योजनेतून बरेच कर्जदार कर्ज मुक्त होतील.
– रामदास सालके – पतसंस्था कर्जदार जवळे, ता. पारनेर.

मूळ राहुरीच्या अल्पवयीन मुलीवर कोपरगावात अत्याचार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पारेगाव खुर्दच्या तरुणास अटक

तळेगाव दिघे (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेत बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी सोनू उर्फ सुधीर संपत मोकळ ( वय 21 वर्षे, रा. पारेगाव खुर्द ) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

मुळच्या मुळानगर ता. राहुरी येथील रहिवाशी असलेल्या व सध्या तळेगाव दिघे येथे मोलमजुरीच्या निमित्ताने राहणार्‍या एका महिलेची अल्पवयीन मुलगी दि. 12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शौचास जाते असे सांगून घरातून बाहेर गेली, ती पुन्हा घरी परतली नव्हती. कुणीतरी आपल्या मुलीस पळवून नेल्याच्या आईच्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.

दरम्यान, पीडित मुलीने तिच्या आई व मामा समवेत येऊन सोनू उर्फ सुधीर संपत मोकळ ( वय 21 वर्षे, रा. पारेगाव खुर्द ) याने आपणास ‘तू जर माझेशी लग्न केले नाहीतर मी जीव देईन.’ अशी आईच्या मोबाईलवर धमकी देत पळवून नेले. दि. 12 डिसेंबर ते दि. 15 डिसेंबर 2019 या काळात बळजबरीने अत्याचार केल्याचा जबाब पोलिसांना दिला. आरोपी मोकळ याने या मुलीस ठाणे येथील त्याचे खोलीवर नेऊन तसेच कोपरगाव येथे मित्राच्या मेव्हण्याच्या घरी नेत, स्वतःच्या हातावर चाकूने मारून घेऊन बळजबरीने अत्याचार केल्याचा जबाब पीडित मुलीने नोंदविला.

त्यानुसार दाखल गुन्ह्यात भादंवि 366 (अ), 376 (2), (एन) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 4 व 6 प्रमाणे वाढीव कलम नोंदविले. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी सोनू उर्फ सुधीर संपत मोकळ यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे.

रात्रभर गस्त, तरीही चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

एमआयडीसी कार्यक्षेत्रातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर (प्रतिनिधी) – नागापूर एमआयडीसीत मागील काही दिवसांपूर्वी धाडसी चोर्‍या झाल्या. एमआयडीसी पोलिसांकडून नेहमीच गस्त सुरू असतानाही चोर्‍यांचे प्रमाण कमी होत नसल्याने एमआयडीसीतील नागरिक त्रस्त आणि भयभीत झाले आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागातील 31 गावांचा समावेश होतो. तसेच, संपूर्ण एमआयडीसी, नागापूर व नगर-औरंगाबाद, नगर-मनमाड व नगर-कल्याण महामार्गााचा काही भाग येतो. एका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा मोठा परिसराचा समावेश केला गेला आहे. लोकवस्ती जास्त असून, तुलनेत पोलीस कर्मचारी संख्या अगदीच तोकडी आहे.

एक सहायक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व 65 कर्मचारी असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे संख्याबळ आहे. एमआयडीसी असल्याने बाहेरील आलेल्या नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. तीन महामार्गवर सतत वर्दळ असल्याने अपघाताचे प्रमाण मोठे आहे. शंभर पेक्षा जास्त पोलिसांची आवश्यता असताना व चार ते पाच पोलीस उपनिरीक्षकांची आवश्यकता असताना कमी कर्मचार्‍यांवर काम सुरू आहे.

अशा परिस्थितीत रात्रीच्यावेळी वाढत्या चोरीचे प्रमाण लक्षात घेता पोलिसांकडून दररोज रात्री अकरा ते पाच यावेळेत गस्त घातली जाते. दोन चारचाकी वाहनांचे गस्तीसाठी पथक तयार करण्यात आले आहे. एका पथकाबरोबर चार ते पाच कर्मचारी असतात. दुचाकीवर दोन कर्मचार्‍यांचे पथक गस्तीवर असते.

एक पथक नगर-औरंगाबाद महामार्गावर, एक पथक नगर-मनमाड महामार्गावर तर, एक पथक एमआयडीसी परिसरात गस्त घालत असते. मध्यंतरी नवनागापुरातील एक टायरचे गोदाम फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे टायर लंपास केली. विशेष म्हणेज चोरट्यांनी गोदाम फोडून रात्रभर टायर गोदामातून बाहेर काढून एका शेतात वाहून नेले.

त्यांची ही कृती रात्रभर सुरू होते. तरीही गस्त घालण्यासाठी असलेल्या पथकाला हा प्रकार लक्षात आला नाही. काही स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर पोलीस आले. मध्यंतरी गजानन कॉलनीतील एक बंद घरफोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोने चोरुन नेले. अशा एक ना अनेक घटना दररोज घडत असतात. काही पोलीस ठाण्यात फिर्याद देतात तर काही देत नाही. ज्यांनी दिली त्यांचा चोरीचा तपास लागत नाही.

एमआयडीसीमध्ये मोठ-मोठ्या कंपन्या आहेत. बाहेर गावावरून येथे आलेल्या लोकांची संख्याही मोठी आहे. काही कामानिर्मीत्त बाहेर गेले तर त्यांचे घर असुरक्षित असते. कंपन्या, लोकांची घरे असुरक्षित असतात. परंतु अपुर्‍या कर्मचारीवर पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे. त्यात जे पोलीस कर्मचारी गस्त घालतात त्यांच्या गस्तीबाबत शंका निर्माण होत आहे. अकरा ते पाच गस्त घालतात तर धाडशी चोर्‍या होतात कशा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

रोजगार हमीचा 1 हजार 585 कोटींचा आराखडा !

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

2020-21 वर्ष : 1 लाख 40 हजार कामांना मान्यता : 4 कोटी 57 मनुष्यदिनांची निर्मिती

अहमदनगर – जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने पुढील आर्थिक वर्षातील 2020-21 साठीचा ग्रामपंचायत आणि यंत्रणेचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात सेल्फवर 1 हजार 585 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली असून यातून 1 लाख 40 हजार कामे उभी राहणार आहेत. आराखड्यात 4 कोटी 57 लाख 95 हजार मनुष्यदिनाची निर्मिती होणार आहे.

यंदाच्या आरखड्यात अ, ब, क, कॅटेगरीनुसार यंदापासून नव्याने ‘ड’तयार करून त्यानुसार रोजगार हमी योजनेतून कामे करता येणार आहेत. या ‘ड’ कॅटेगिरीत आता खेळाचे मैदान, आरसीसी मुख्य निचरा प्रणाली, रस्ता, सिमेंट रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, डांबरी रस्ता, शाळेसाठी कुंपन, चक्रीवादळ निवारा, ग्रामपंचायत राजीव गांधी भवन, अंगणवाडी, छतासह बाजार ओटा, शालेय स्वयंपाकगृह निवारा आणि स्माशानभूमी शेड बांधकाम करण्यात येणार आहे.

या कॅटेगिरीतील 13 हजार 710 कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यंदापासून अभिसरण म्हणून संबोधित असणार्‍या कामांना त्यामुळे विभागाकडून अतिरिक्त निधी आणि नरेगातून अकुशल वर्गवारीतून निधी देण्यात येणार आहे. यामुळे खर्‍याअर्थाने रोजगार हमीची व्याप्ती वाढणार आहे. रोजगार हमी योजना ही जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना अशा दोन स्वतंत्र विभागातून राबविली जाते. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंजुरी देण्यात येणार्‍या कामांना यंत्रणेकडील तर जिल्हा परिषदेकडील कामांना ग्रामपंचायतींकडील कामे असे संबोधण्यात येते.

पुढील आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागाने आराखडा तयार केला असून यात सिमेंट बंधार्‍यांची 505, भूमिगत बंधार्‍यांची 506, गॉबियन बंधारे 898, विहीर पुनर्भरण 6 हजार 347, शोषखड्डे 20 हजार 315, नाला बांध 1 हजार 360, सलग समतल चर 10 हजार 659, पाझर तलाव दुरूस्ती 148, नालाखोलीकरण व रुंदीकरण 126, गाळ काढणे 787, वनीकरण व गट लागवड 920, शेतबांध बंदिस्त 9 हजार 467, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड 1 हजार 145, रोपवाटीका 346, सिंचन विहीर 5 हजार 523, शेततळे आणि सामुदायिक शेततळे 6 हजार 513, फळबाग लागवड 12 हजार 357, रेशम उत्पादन 501, विखुरलेली वृक्ष लागवड 2 हजार 479, घरकुल 9 हजार 50, गुरांचा गोठा 10 हजार 786, शेळीपालन शेड 3 हजार 919, कुक्कुटपालन शेड 1 हजार 724, बचत गटाच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे 177, मत्स्यपालन 53, नाडेप कंपोस्ट 11 हजार 451, व्हर्मी कंपोस्ट 8 हजार 470, अझोला उत्पादन 332, सार्वजनिक जागेवरील गोदाम 10, शौचालय 8 हजार 407 आदींचा समावेश असून या कामांची संख्या 1 लाख 40 हजार आहे.

यासाठी 989 कोटी 43 लाख 28 हजार रुपयांच्या अकुशल तर 596 कोटी 3 लाख 37 हजार कुशल अशा 1 हजार 585 कोटी 46 लाख रुपयांच्या कामांना या आराखड्यात मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्याला मागील आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आलेली आहे.

साडेचार कोटी लोकांना मिळणार रोजगार
‘रोहयो’ विभागाच्या नियोजनानुसार पुढील आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 4 कोटी 57 हजार लोकांना रोहयोतून कामे मिळू शकतील असे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 4 कोटी 57 लाख मनुष्यदिनांची निर्मिती करण्यात आली आहे. एका मजुराला एका दिवसाला मिळणारे काम म्हणजे एक मनुष्यदिन असल्याचे रोहयो विभागाकडून सांगण्यात आले.

अखेरच्या दिवशी एका उमेदवाराची माघार नेवाशाच्या नगराध्यक्षपदासाठी सरळ लढत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नेवासा (शहर प्रतिनिधी)- नेवासाच्या नगराध्यक्षपदाच्या उद्या बुधवारी होत असलेल्या निवडीसाठी काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने भाजपा-काँग्रेस व अपक्षांच्या नगरपंचायत विकास आघाडी व आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीकारी शेतकरी पक्षात सरळ लढत होणार आहे.

भाजपच्या डॉ. सौ. प्रमिला सांगळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसकडून निवडून गेलेल्या व नगरपंचायत विकास आघाडीतील सदस्य असलेल्या सौ. शालिनी संजय सुखदान तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेविका योगीता सतीश पिंपळे यांच्यात सरळ लढत होणार आहे.

दोन्ही गटांकडे समसमान संख्याबळ असल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले असून नागरिकांत उत्सुकता वाढली आहे

नेवासा नगर पंचायतीची निवडणूक 24 मे 2017 रोजी झाली होती. नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल दि. 19 डिसेंबर रोजी पूर्ण झाल्याने पुढील कार्यकाळासाठीची नगराध्यक्षपदाची निवड उद्या दि. 18 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून सौ. योगीता पिंपळे तर नगरपंचायत विकास आघाडीकडून सौ. शालिनी संजय सुखदान व डॉ. सौ. प्रमिला सांगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काल दि. 16 डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारीखेस डॉ. सौ. सांगळे यांनी अर्ज मागे घेतल्याने दोन्ही गटांकडून एकास एक उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत

प्रभाग क्रमांक तेरातील नगरसेविका फेरोजबी इमामखान पठाण यांचे पद रद्द झाल्याने क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 9 वरून 8 झाली आहे. तर गट नोंदणीमध्ये भाजपा, इंदिरा काँग्रेस व अपक्ष मिळून बनलेल्या नगरपंचायत विकास आघाडीचे 8 नगरसेवक आहेत.

समसमान नगरसेवक दोन्हीकडे असल्याने कोण बाजी मारणार याबाबत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन काम पाहत आहेत.

साईबाबांचे व माझे अतूट नाते असे म्हणत राणी झाली भावनाविवश

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- मी लग्नानंतर प्रथमच साईबाबांच्या दर्शनाला आले असून साईबाबांचे आणि माझे एक अतूट नाते असल्याने माझ्या डोळ्यात अश्रू ढाळले असल्याचे वक्तव्य बॉलीवुडची सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री राणी मुखर्जी हिने शिर्डीत केले.

हिंदी चित्रपट सृष्टीतील सिनेतारका राणी मुखर्जी हिने मध्यान्ह आरतीनंतर साईदरबारी हजेरी लावत साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राणी मुखर्जीचा साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व त्यांच्या पत्नी जयश्री मुगळीकर यांनी शाल व साईंची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे, दिलीप उगले, मंदिर सुरक्षेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.

राणी मुखर्जी साईबाबांची नि:स्सीम भक्त असून दहा वर्षांपूर्वी तिने साईंच्या पुण्यभूमीत वास्तव्य करण्याचे ठरविले होते आणि त्यासाठी जागाही खरेदी केली आहे. दरम्यान बाबांवरील अपार श्रद्धा असलेल्या राणीने काल साई मंदिरात जाऊन साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी बाबांच्या समाधीसमोर हात जोडलेले असताना राणीच्या डोळ्यातून अश्रूंंच्या धारा वाहत होत्या.अश्रू पुसतच साईंचे दर्शन घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले.

शिर्डीत घर लवकर बांधून व्हावे
दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना राणी म्हणाली की, माझे लग्न झाले असून मला एक मुलगी आहे. लग्नानंतर मी प्रथमच साईबाबांच्या दर्शनासाठी आले. साईबाबांच्या दर्शनासाठी यायचं होतं आणि बाबांनी मला बोलावून घेतल्याचे सांगत साईबाबांना धन्यवाद दिले असल्याचे सांगितले. दरम्यान शिर्डी येथील माझे घर लवकर बांधून व्हावे यासाठी आपण प्रार्थना केली असल्याचे तिने सांगितले.

श्रीरामपुरात सर्वपक्षियांचा रास्तारोको

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कोळपेवाडी अत्याचारप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी (सुरेगाव) येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला त्वरित अटक करून भर चौकात फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी सर्वपक्षियांच्यावतीने श्रीरामपुरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. कोळपेवाडी येथील इयत्ता चौथीत शिकणार्‍या मुलीला गाडीवर नेऊन फार्महाऊसवर अत्याचार करण्यात आला. या घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत आहेत.

त्यामुळे या आरोपीस त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भीमशक्ती सामाजिक संघटना, बहुजन वंचित आघाडी, बसपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, लहुजी सेना, विश्‍व हिंदू परिषद, आम आदमी पार्टी, मानवाधिकार संघटना, मराठा सेवा संघ, स्वारिप, कामगार संघटना या सर्वपक्षियांच्यावतीने रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन व भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांना देण्यात आले.

यावेळी कोपरगाव येथील घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला त्वरित अटक करावी तसेच अत्याचार करणार्‍या आरोपीला एका महिन्यात फाशी देण्यात यावी हा कायदा करून लवकरच अंमलात आणावा, अशी मागणी सर्वपक्षियांच्यावतीने करण्यात आली. आरोपीला आठ दिवसांच्या आत अटक न केल्यास जिल्ह्यामध्ये उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमशक्तीचे संदीप मगर यांनी दिला आहे.

यावेळी मनसेचे बाबा शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश जाधव, मानवाधिकार संघटनेचे प्रविण फरगडे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडधे, वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन, लहुजी सेेनेचे बाळासाहेब बागुल, हानिफ पठाण, कामगार नेते नागेश सावंत, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, विश्‍व हिंदू परिषदेचे रुपेश हरकल, मराठा सेवा संघाचे राजेंद्र भोसले, बसपाचे प्रकाश आहिरे यांची निषेधार्थ भाषणे झाली.

यावेळी बसपाचे मच्छिंद्र ढोकणे, काँग्रेस सेवा दलाचे डॉ. वैभव पंडित, रावसाहेब आल्हाट, स्वारिपचे अमोल काळे, गौतम राऊत, नगरसेवक रवि पाटील, मुन्ना पठाण, विलास ठोंबरे, सुमेश पडवळ, शुभम लोळगे, किरण कटके, दीपक शिंदे, सुनील संसारे, रामदास रेणे, विनोद शिरसाठ, संदीप अमोलिक, अरुण शरणागते, नितीन क्षीरसागर, राजू एडके, आनंद पठारे, सचिव विधाटे, अवि जगताप, संतोष मगर, कुणाल वाहुळ, मनोज सोनवणे, ऋतिक पाईक, गणेश म्हस्के, अनिल सगळगिळे, तुषार पारधे, किरण शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रवरासंगमच्या घटेश्‍वर मंदिराजवळ घाट व स्मशानभूमीची कामे करा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

ग्रामस्थांची मागणी; जलफुगवट्यामुळे धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांचे होतात हाल

देवगडफाटा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील टोका प्रवरासंगम येथील नदीकाठी प्रवरा-गोदावरी संगमाशेजारी घटेश्‍वराच्या पुरातन मंदिराजवळ घाट बांधण्याची तसेच अमरधामचे काम करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत माहिती अशी की, प्रवरासंगम येथे प्रवरा-गोदावरी नद्यांचा सगंम होतो अशा पवित्र ठिकाणी घटेश्‍वर मंदिर आहे. या ठिकाणी राज्यभरातून धार्मिक विधीसाठी व दर्शनासाठी नागरिक, भाविक येत असतात. येथे कायमच धार्मिक कार्यक्रम सुरू असतात.़ परंतु येणार्‍या भाविकांना घाट नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. जुना घाट जीर्ण झालेला असून तो जलफुगवट्यामुळे नेहमी पाण्यातच असतो. त्यामुळे नवीन घाट होणे आवश्यक आहे.

नगर जिल्ह्यातील हजारो कावडीवाले या ठिकाणावरून पाणी घेऊन पायी जातात व मंदिरात मूर्तींना अर्पण करतात. तेथे नदीपात्रातील पाणी घेण्यासाठी घाट नसल्याने अडचणी येतात. तसेच ऋषीपंचमीला हजारो महिला पवित्र स्नानासाठी याठिकाणी येतात अशावेळी गैरसोय होते. घटेश्वर मंदिराजवळ सिद्धेश्वर मंदिर देवस्थान येथे घाट असला तरी तो अपुरा पडतो अशावेळी घटेश्वर मंदिराजवळ नवीन घाट होण्याची गरज आहे. याठिकाणी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अशोक सिंघल, बाळासाहेब विखे पाटील आदी नेत्यांच्या अस्थि विसर्जन झाले आहे. अनेक वर्षे लोटली तरी कोणीच या कामाकडे आजपर्यंत लक्ष दिले नाही

प्रवरासंगम व टोका दोन्ही गावांची मिळून लोकसंख्या 7 हजारांच्या आसपास आहे. प्रवरा-गोदावरी संगम होतो त्या जवळच घटेश्वर मंदिराजवळ जुने अमरधाम (स्मशानभूमी) आहे परंतु हे अमरधाम अनेक वर्षांपासून चोहोबाजूंनी काटेरी वेड्या-बाभळीच्या झुडपांच्या विळख्यात अडकले आहे. अंत्यविधीसाठी दोन शेडची आवश्यकता आहे परंतु याठिकाणी एकही शेड नाही. नदीपात्र जवळ असूनही स्नानासाठी सुविधा नाही. वीज जवळ असून वीजपुरवठा होत नाही. पावसाळ्यात जर निधन झाले तर अडचणीत आणखीच भर पडते. अंत्यविधीस आलेल्या लोकांना बसण्यासाठी सुध्दा व्यवस्थित जागा नाही. अमरधामकडे जाणारा अर्धा किलोमीटरचा रस्ताही खराब आहे. जायकवडीचा पाणी फुगवटा वाढल्याने आता चोहोबाजूंनी पाणी आहे. त्यामुळे भराव टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे घाट व अमरधाम काम होणे आवश्यक आहे.

ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून या दोन्ही कामाची मागणी आहे .परंतु अद्याप ही कामे रेंगाळली आहेत. अनेक वर्षे लोटली तरी कोणीच या कामाकडे लक्ष दिले नाही. टोका व प्रवरासंगम गावकर्‍यांनी लोकवर्गणीतून दोन वर्षांपूर्वी 1500 ट्रॅक्टरच्या खेपा टाकून काही प्रमाणात भराव केला आहे व थोड्याफार प्रमाणात जागा केली आहे. पण हे काम मोठे आहे हे होण्यासाठी प्रशासनाच्या मदतीची गरज आहे असे गावातील नागरिकांना वाटते.

टोका, प्रवरासंगम ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी सिद्धेश्वर व घटेश्वर मंदिर परिसरात प्रवरा, गोदावरी व गुप्त सरस्वती असा नद्यांचा त्रिवेणी संगम होत असल्याने राज्यभरातून धार्मिक विधीसाठी भाविक येतात.त्यामुळे येथे शासनाने मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लावावीत.
-सुनील बाकलीवाल, सरपंच, प्रवरासंगम