Wednesday, June 24, 2026
Home Blog Page 13465

संगमनेरातून युवकाचे अपहरण; जुन्नर येथे विजेच्या खांबाला बांधून मारहाण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नऊ जणांविरुद्ध गुन्हा; आरोपींच्या नातेवाईकांकडून युवकाच्या आईला दमबाजी

संगमनेर (प्रतिनिधी) – मोबाईलवरून वाईट शिवीगाळ करू नको, असे म्हणाल्याचा राग येऊन नऊ जणांनी एका जणास संगमनेरातून चारचाकी वाहनात घालून उचलले. ते थेट पिंपळवंडी व जुन्नर येथे नेऊन विजेच्या खांबाला बांधून त्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा संगमनेर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तर याच प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांनी अपहरण केलेल्या युवकाच्या आईला दमबाजी केल्याने दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अखलाक असिफ शेख (वय 24, रा. कुरण, ता. संगमनेर) हा घरी असताना त्याच्या भावाच्या मोबाईलवर इमरान कुरेशी हा भावाला शिवीगाळ करत होता. तेव्हा अखलाक याने सदर मोबाईल भावाकडून घेतला व इमरान कुरेशी यास शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली. याचा इमरान कुरेशी याला राग आला. दरम्यान अखलाक शेख हा रात्री 10 वाजेच्या सुमारास संगमनेर नाटकी येथे रोडवर गॅरेजसमोर उभा होता. त्यावेळी फयाज कुरेशी व इमरान कुरेशी (रा. कसाईवाडा, जुन्नर) हे दोघे तेथे आले. त्यांनी मोबाईलवरुन शिवीगाळ का केली असे विचारत अखलाक शेख याची गचांडी पकडून त्याला मारुती इरटिका चारचाकी वाहनात टाकले. वाहनात अगोदरच कसाईवाडा येथे राहणारे अयाज कुरेशी, मुजाहिद कुरेशी, महम्मद गौस, सादिक गफुर कुरेशी हे बसलेले होते.

त्यावेळी त्यांनी अखलाक शेख यास शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली व वाहन पुण्याच्या दिशेने सुरु केले. अखलाक शेख याच्या खिशातील 15 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल देखील त्यांनी काढून घेतला. पिंपळवंडी येथे पुलावर येऊन आयाज कुरेशी व इमरान कुरेशी यांनी अखलाक यास वाहनातून खाली उतरवून पुलावर नदी पात्रात लटकवून पुन्हा वर घेऊन हाताने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा वाहनात टाकले व त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकू असे म्हणत जुन्नर येथे नेले. तेथे कसाईवाडा येथे विजेच्या खांबाला अकलाख यास जनावरांच्या दोराने बांधले व इमरान कुरेशी, फयाज कुरेशी, इसराल बेपारी, सादीक गफृर बेपारी, शादाफ कुरेशी, अयाज कुरेशी, मुजाहिद कुरेशी, महम्मद गौस, सादिक गफूर कुरेशी व इतरांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.

याबाबत अखलाक असिफ शेख याने जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील 9 जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता 367, 327, 341, 324, 143, 147, 149 प्रमाणे दाखल केला आहे. दरम्यान अखलाक शेख याचे संगमनेरातून अपहरण केल्याने सदर गुन्हा शून्यने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आला असून 641/19 प्रमाणे दाखल झाला आहे.

दरम्यान याप्रकरणातील फिर्यादी अखलाक शेख याची आई निलोफर आसिफ शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) हिला गुलजार पठाण (जुन्नर), अजीज कुरेशी (जुन्नर) यांनी संगमनेरला येऊन धमकावले. तुझ्या मुलाला फिर्याद मागे घ्यायला लाव नाहीतर तुझ्या मुलांना महागात जाईल, नाहीतर त्यांना परत उचलून घेऊन जाऊ, अशी धमकी दिली. याबाबत निलोफर शेख हिने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लग्न समारंभातून 17 तोळे सोने असलेली पर्स लांबविली

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

राहाता (तालुका प्रतिनिधी)- राहाता शहरातील कुंदन लॉनमध्ये लग्न समारंभातून 17 तोळे सोने व 10 हजार रोख असा सात लाख रूपये किमतीचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्याने पळविली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना गुरुवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास राहाता येथील कुंदन लॉन्समध्ये घडली. श्रीरामपूर येथील उद्योजक मुळे यांच्या कुटुंबातील विवाहासाठी डॉ. मंजुषा नरेंद्र कुलकर्णी, नंदिग्राम कॉलिनी, औरंगाबाद या आल्या होत्या. त्या विवाहस्थळी खुर्चीवर बसल्या होत्या. त्यांच्या बहीणीने ग्रे रंगाची पर्स त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिली होती. त्यांनी ती शेजारील मोकळ्या खुर्चीवर हातातील पर्स ठेवली व नातेवाईकांशी बोलत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून ती पर्स पळवून नेली.

या पर्समध्ये दोन राणी हार व दोन कानातले जोड वजन साडेतीन तोळे, साखळी मनी व पदक वजन 7 तोळे, नेकलेस, चार बांगड्या, दोन अंगठ्या, एक ब्रासलेट, सॅमसन कंपनीचे दोन मोबाईल, एटीएम, पावर बँक, असे सर्व साहीत्य 17 तोळे सोने व 10 हजार रूपये रोख असा सुमारे सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

याप्रकरणी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कुंदन लॉन्समधील सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता एक संशयित तरुण हातात पर्स घेऊन जाताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहाता शहरातील मंगल कार्यालयात अशा चोरीच्या अनेक घटना घडल्या तसेच बाहेर गर्दीत गंठन चोरीच्या घटनाही घडल्या होत्या. त्या अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.

कुकडी प्रकल्पातील संपादित जमिनीचा मोबदला मिळणार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कर्जत (तालुका प्रतिनिधी) – कुकडी प्रकल्पासाठी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनी शासनाकडून संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा मोबदला अद्याप शेतकर्‍यांना मिळालेला नव्हता. आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून सुमारे 54 गावांच्या भू-संपादन मोबदल्यासाठी प्रयत्न केले.

सध्या तालुक्यातील जळकेवाडी, राशीन, येसवडी, धालवडी, बारडगाव दगडी, तळवडी अशा एकूण 6 गावांचा भूसंपादन मोबदला मंजूर झाला असून उर्वरीत गावांनाही हा मोबदला मिळण्यासाठी आमदार पवार यांच्याकडून पाठपुरावा सुरूच आहे. मंजूर झालेल्या 6 गावांना सुमारे 26 कोटी रुपयांचा मोबदला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जळकेवाडी गावातील 62 लाभार्थीना 6 कोटी 85 लाखांचा मोबदला प्रातिनिधिक स्वरूपात वाटपाचे पत्र व धनादेश देऊन वाटप करण्यात येणार आहे. शासनाकडून जसजशी खरेदी होईल तशी ही खरेदी झालेल्या भूखंडाची रक्कम कोळवडी भूसंपादन विभागाकडे जमा होत आहे.त्यानुसार हे वाटप करण्यात येणार आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता धुमाळ, कार्यकारी अभियंता जगताप व स्थानिक पदाधिकारी व उर्वरित भू संपादनाच्या 53 गावांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज सकाळी 10 वाजता जळकेवाडी येथे भू संपादन मोबदल्याचे वाटप करण्यात येणार आहे.
कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भू संपादनाच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा करत संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याशी कायम समन्वय साधत होते.अनेक गावांतील शेतकर्‍यांच्या संपादित झालेल्या जमिनींचा टप्प्याटप्प्याने मोबदला मिळणार असून कुकडीच्या पाणी वाटपासंदर्भातही आमदार पवार यांनी वेळोवेळी लक्ष घातले आहे. शेतकर्‍यांना हक्काचे पाणी मिळावे, भु-संपादनाचा मोबदला मिळावा यासाठी कायम प्रयत्न केले आहेत.

कुकडीच्या पाण्याबाबत नियोजन बैठक
भू संपादन मोबदला वाटपानंतर आमदार रोहित पवार यांच्या वतीने कोळवडी येथे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत कुकडीच्या पाण्यासंदर्भात नियोजन बैठक होणार आहे. त्यानंतर सीना धरणावरील 21 गावांच्या पाणी नियोजनाबाबतची बैठक सीना धरणाच्या विश्रामगृहात सायंकाळी 6 वाजता आमदार पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार असून ते ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून 52 महिलांना लाखोंचा गंडा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

आरोपी मूळ नेवासा तालुक्यातील तळेवाडीचा

नाशिक – पैसे कमावण्यासाठी एका भामट्याने बनावट नावाने जीवनसाथी डॉट कॉम आणि मॅट्रिमनी डॉट कॉम या संकेतस्थळांच्या माध्यमातून घटस्फोटित, विधवा आणि विवाहेच्छूक अशा तब्बल 52 महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या ठकास गुरुवारी (दि.5) रात्री अटक करण्यात आली. नाशिकमध्ये महिलेला भेटण्यास आलेल्या या भामट्याला खुद्द पीडित महिला, छत्रपती सेना आणि नाशिक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. संपत चांगदेव दरवडे ऊर्फ मनोज पाटील ऊर्फ मयूर पाटील (34, मूळ रा. तळेवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर, सध्या रा. मुहम्मदवाडी, हडपसर, पुणे) असे अटक झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संपत दरवडे याचा 2014 मध्ये आरती बरोबर विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर सात महिन्यांत त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्यावर 13 लाखांचे कर्ज होते. यादरम्यान 2015 मध्ये नागपूर येथे राहणारी व पुण्यात काम करणार्‍या घटस्फोटित महिलेशी त्याची ओळख झाली त्यातून त्यांची जवळीक निर्माण झाली व तिच्यासोबत लग्न केल्यास त्याला आर्थिक मदत देऊन आर्थिक अडचण दूर करण्याचे आश्वासन तिने दिले. त्याला पन्नास हजार रुपयाची मदत केली.

याच प्रकारातून त्याने पैसे कमवण्याची नामी युक्ती शोधून काढली. घटस्फोटीत महिला, विधवा महिला व विवाहित महिलांना हेरून त्यांची जवळीक साधून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा त्याने सपाटाच लावला होता. घटस्फोटित महिला, विधवा आणि विवाहेच्छूक महिलांना हेरून त्यांच्याशी जवळीक साधून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत फसवणूक केली.

तो नाशिकमध्ये घटस्फोटित महिलेला भेटण्यास येणार असल्याची माहिती पीडित महिलेकडून छत्रपती सेना आणि काही पीडित महिलांना मिळाली होती. त्यानुसार नागपूर, पुणे, सिंधुदुर्ग येथील पीडित महिला गुरुवारी (दि.5) नाशिकमध्ये दाखल झाल्या. त्यांच्यासह छत्रपती सेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी भामट्याला पंचवटी कारंजा येथील मानस हॉटेलमधून अटक केली. त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदार ओळखपत्र पडताळणी कार्यक्रमावर शिक्षकांचा बहिष्कार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

गणोरे (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील मतदान केंद्रावर बी. एल. ओ. म्हणून काम करणार्‍या शिक्षकांनी इ. व्ही. पी. पी. द्वारे करावयाच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भातले निवेदन राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आले असून, त्याची प्रत तालुका तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी दिल्या जाणार्‍या आदेशाने काम करणारे स्थानिक मतदान केंद्रावरील बीएलओ यांना नव्याने इव्हीपीद्वारे काम करण्यासाठी आदेशित करण्यात आले होते. या संदर्भाने तालुक्यातील सर्व बी. एल .ओ. प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन यासंदर्भात निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सदरची कामे करताना शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून बराच काळ बाहेर राहावे लागते. त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. तर अनेकदा सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत ही कामे सातत्याने करावे लागतात. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. तीन ते चार महिने या कामासाठी शिक्षकांना बाहेर राहवे लागणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

ज्या शिक्षकांना ही कामे दिली जाणार आहेत, त्या शिक्षकांना शिक्षकांच्या जागेवर काम करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात यावे. तसेच सदरचे काम प द्वारे करावयाचे असल्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांना निवडणूक आयोगाच्या वतीने मोबाईल पुरविण्यात यावा. मोबाईल डेटा उपलब्ध करून द्यावा. तसेच अकोले तालुका अत्यंत दुर्गम व डोंगराळ असल्याने अनेक ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही त्याचाही परिणाम कर्मचार्‍यांना सोसावा लागणार आहे.

मतदान केंद्रावरती बीएलओ म्हणून काम करताना शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे असताना एक राष्ट्रीय काम म्हणून शिक्षक हे काम प्रामाणिकपणे करत आहे. अशा परिस्थितीत ई.व्ही.पी. हे काम करताना मोबाईल द्वारे करावे लागणार आहे. या मतदारांना देण्यात आलेल्या मतदार ओळखपत्राचा क्रमांक पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच त्याचे निवासस्थान हेदेखील पडताळणी होणार आहे. अशा परिस्थितीत नागरिक ज्या ठिकाणी राहतात.

तिथे नेटवर्क नसेल, अधिक अंतरावर राहत असल्यास त्या नागरिकांची भेट घेणे कठीण होते. गावाकडे असलेल्या मोठ्या प्रमाणावर मजुरी, कर्मचारी हे आपापल्या कामाला जात असल्यामुळे सदरचे काम हे सकाळी किंवा सायंकाळी अशा स्वरूपात करावे लागणार आहेत. त्यातून अनेक नागरिक बाहेरगावी गेले असतील स्थलांतर झाले असेल तर अशा अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे हे काम करताना शिक्षकांच्या नाकी नऊ येणार आहेत.

पहिल्या सत्रामध्ये कामाचे दिवस कमी भरले असतानाच त्यावेळी निवडणूक प्रक्रिया आणि द्वितीय सत्रामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिक्षकांची होणारी धावपळ शालेय शिक्षण विभागाची असणारे प्रशिक्षण, विविध स्पर्धा लक्षात घेतात शिक्षकांना अध्ययन अध्यापन व मूल्यमापनासाठी कमी कालावधी असल्याने सदरची कामे शिक्षकांच्या माथी मारू नयेत अशाप्रकारची विनंती शिक्षकांच्यावतीने प्राथमिक शिक्षक संजय नवले यांनी केली आहे. तसेच हे काम महिला कर्मचार्‍यांना देण्यात येऊ नये. मुख्याध्यापक पदाचा कार्यभार असणार्‍या शिक्षकांना यातून वगळण्यात यावे.

मागील काळातील बीएलओ असलेल्या कर्मचार्‍यांचे मागील काळातील मानधन राजपाल देण्यात यावे. एक हजारापेक्षा अधिक मतदार असलेल्या केंद्रावर बीएलओ यांना सहायक कर्मचार्‍यांची नियुक्ती करून द्यावी. या कामासाठी ग्रामपंचायत स्तरावर संगणक सुविधा, इंटरनेट व कर्मचारी उपलब्ध असल्याने त्यांच्याकडून काम करून घ्यावे किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली आहे. शिक्षकांवर हे काम करण्याची सक्ती केल्यास मागणी केल्याप्रमाणे साधनसुविधा उपलब्ध करून दिली तरच सदरचे काम केले जाईल असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सध्या बीएलओ म्हणून मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या महिला व पुरुष कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

महापालिका – पोलीस बंदोबस्तात वसुली; मालमत्तांचा लिलाव करणार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

थकित कर जमा करण्यासाठी महापालिकेने जोर वाढविला

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेने आता वसुलीसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. तसेच यापूर्वी सील केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचीही तयारी सुरू केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दि. 6 रोजी 25 लाखांची वसुली करण्यात आली. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे दहा लाख रुपये आहेत.

जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी पदभार स्वीकारताच वसुली आणि स्वच्छता अभियानाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मालमत्ता कराची जवळपास 285 कोटींची थकबाकी असून, त्यातील अनेक प्रकरणे न्यायालयीन प्रवीष्ठ आहेत. मात्र जे न्यायालयात प्रकरणे नाहीत, मात्र जाणीवपूर्वक संबंधित मालमत्ताधारकाकडून कर जमा केला जात नाही, अशांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्विवेदी यांनी दिले आहेत. यासाठी मालमत्ता जप्त करण्यापासून, संबंधित मालमत्तेचे नळजोड तोडण्याचेही आदेश दिले आहेत.

शिवाय थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर झळकविण्याचीही तयारी सुरू आहे. द्विवेदी आज महापालिकेत जवळपास चार तास ठाण मांडून होते. या काळात त्यांनी विभागप्रमुखांना स्वतंत्रपणे बोलावून कामकाजाचा आढावा घेतला. तसेच काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत थ्री स्टार मानांकन मिळविण्यासाठी ते रोज पाठपुरावा करत आहेत. आजही त्यांनी याबाबत माहिती घेतली. तसेच सायंकाळी उशीरा जिल्हाधिकारी कार्यालयातही महापालिकेच्या अधिकार्‍यांना बोलावून रोजच्या कामाचा आढावा घेतल्याचे समजते.

मालमत्ता कर वसुलीचे प्रत्येक प्रभाग समित्यांना उद्दिष्ट दिलेले असल्याने सर्वच कर्मचारी आता कामाला लागले आहेत. आज याचाच परिणाम म्हणून 25 लाखांची वसुली झाली. बाजार समितीकडे थकित असलेले दहा लाख रुपये कारवाईचा बडगा उगारताच जमा झाले. यापुढे वसुली मोहीम तीव्र होणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणीही पोलीस यंत्रणेकडे करण्यात आली आहे. यामध्ये एक अधिकारी आणि आठ पुरूष व आठ महिला कर्मचार्‍यांची मागणी केली आहे.

प्रत्येक प्रभाग समितीमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात वसुली मोहीम आणि कारवाई करण्यात येणार आहे. अनेकदा जप्तीची कारवाई करताना महापालिका कर्मचार्‍यांना विरोध केला जातो. काही वेळा शिविगाळ व मारहाणीचेही प्रकार घडतात. तसेच यावेळी केवळ जप्तीवरच न थांबता नळजोड तोडण्याचीही कारवाई होणार असल्याने पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितल्याने त्यासाठी द्विवेदी यांनी तयारी दर्शवून पोलीस यंत्रणेकडे तसे पत्र दिले आहे. तसेच यापूर्वी थकबाकी जमा न करणार्‍या मात्र त्यामुळे सील केलेल्या मालमत्तांची थकित रक्कम अदा झालेली नाही. जप्तीची कारवाई करूनही मालमत्ताधारक थकबाकी जमा करत नसल्याने या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय झाला आहे. महापालिकेने तशी यादी तयार केली असून, त्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.

प्लॅस्टिकविरोधी कारवाईवरून वादावादी
महापालिकेने प्लॅस्टिक विरोधी कारवाई जोरदार सुरू केली आहे. गुरूवारी 92 हजार रुपयांचा दंड जमा केल्यानंतर शुक्रवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती. सायंकाळपर्यंत 26 हजारांचा दंड जमा केला होता. मात्र व्यावसायिक आणि कारवाई करणारे कर्मचारी यांच्यात अनेक ठिकाणी खटके उडत होते. कोणत्या प्लॅस्टिकला परवानगी आहे, कोणत्या नाही, हे वादाचे कारण होते. त्या संदर्भातील तक्रारीही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे येत होत्या. मात्र कारवाई सुरूच ठेवण्यात आल्याने प्लॅस्टिकचा वापर करणार्‍या व्यावसायिकांना दंड भरण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

सिंचन योजनांमध्ये रुपयाचीही अनियमितता नाही – आ.महाजन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

युती सरकारच्या काळात राज्यातील 476 पैकी 310 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ही कार्यवाही अत्यंत पारदर्शक झाली असून यात 1 रुपयाचीही अनियमितता नाही.

हवे तर या प्रकरणाची उच्चपदस्थ अधिकार्‍यांची समिती नेमून चौकशी करा, असा खुलासा वजा आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी ठाकरे सरकारला दिले आहे. त्यासोबतच ही कामे अधिक काळ बंद राहिल्यास हा खान्देशच्या विकासावर परिणाम होईल, असेही ते म्हणाले.

राज्यातील 5 सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध झाले. याप्रश्नी खुलासा करण्यासाठी महाजन यांनी शुक्रवारी दुपारी जळगावात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सिंचन गैरव्यवहाराचे सारे आरोप फेटाळले.

महाजन पुढे म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात सिंचन योजनांमध्ये अनेक गैरव्यवहार समोर आल्याने त्यांची चौकशी झाली होती. त्यानंतर न्यायालय आणि चितळे समितीने अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यता घेतल्याशिवाय पूर्ण करू नयेत, असे निर्देश दिले होते.

युती सरकार सत्तेत आल्यावर न्यायालय आणि चितळे समितीच्या निर्देशानुसार, आम्ही 476 पैकी 310 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. ही कार्यवाही करताना कुठेही अनियमितता झालेली नाही. मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनुशेष भरून काढण्यासाठी प्राधान्य दिले.

त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भासाठी एक वेगळी तर उत्तर महाराष्ट्रासाठी एक वेगळी अशा राज्यस्तरीय दोन तांत्रिक सल्लागार समित्या नेमल्या. एवढंच नव्हे तर नियोजन, वित्त आणि जलसंपदा विभागाच्या सचिवांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती तसेच तांत्रिक सल्लागार समितीच्या निर्णयानंतरच हाती घेतलेल्या सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. नियोजन आणि वित्त विभागाच्या मंजुरीनंतरच सिंचन योजनांच्या कामांना सुरुवात झाली आहे.

काही प्रकल्पांना केंद्राकडून निधी

राज्यातील अपूर्ण राहिलेल्या अनेक मोठ्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजना तसेच बळीराजा सिंचन योजनेतून निधी मंजूर करून आणला.

त्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून 26 तर 96 प्रकल्पांना बळीराजा सिंचन योजनेतून निधी आणला. आज त्यांची कामे वेगात सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातील वाघूर, शेळगाव बॅरेजसारख्या प्रकल्पांनादेखील अशाच पद्धतीने निधी आणला, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

फक्त राजकारण होता कामा नये

मागील काळात सेना आमच्याबरोबर सत्तेत होती. सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्याचा निर्णय त्यांनी आमच्यासोबत घेतला. त्यांच्यासाठी महत्त्वाचे असलेल्या अनेक प्रकल्पांना त्यांनी मंजुरी मिळवून घेतली. असे असताना आता हा विषयावर राजकारण करायला नको होता, अशा शब्दात महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.

आ.गिरीश महाजनांचे खडसेंना खुले आव्हान

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पंकजा मुंडे, अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचा पराभव करणार्‍या स्वपक्षातील लोकांची नावे जाहीर करा !

जळगाव – 

पक्षात कुणीही कुणाला पाडण्याचे उद्योग करणार नाही. खडसे यांना जर संशय असेल तर त्यांनी असे काम करणार्‍यांची  नावे पुराव्यासह जाहीर करावीत, असे  खुले आव्हान आ.गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना दिले आहे.

भाजपाच्या पंकजा मुंडे व मुक्ताईनगरातील उमेदवार अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना पक्षांतर्गत कारवाया करुन पाडल्याचा आरोप निरर्थक आहे. मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथराव खडसे 2014 च्या निवडणुकीत कमी फरकाने विजय झाले होते.

यंदा तर अ‍ॅड. रोहिणी खडसेंविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रस हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंकजा मुंडे व रोहिणी खडसे यांना पक्षांतर्गत कारवाया करुन पाडल्याचा एकनाथराव खडसे यांच्या आरोपावर शुक्रवारी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना पत्रकारांनी विचारणा केली.

त्यावेळी महाजन यांनी सांगितले की, भाजपाने कायम ओबीसींना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका ठेवली आहे. सत्तेत असताना अनेक महत्त्वाच्या मंत्रिपदावर ओबीसी नेतेच होते. मुक्ताईनगरात मागील काळात एकनाथराव खडसे एकवेळा 1200 मतांनी विजयी झाले होते.

तसेच मोदी लाट असतानाही त्यांना 8500 मताधिक्य होते. यंदा तर या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे ती पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होऊन रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. कदाचित रोहिणी खडसेंऐवजी एकनाथराव खडसे असते तर विजयी झाले असते, असेही महाजन यांनी सांगितले.

कुणीही पक्ष सोडणार नाही

भाजपातील नेते पक्ष सोडण्याच्या मार्गावर असल्याच्या केवळ अफवा व कल्पना आहेत. कुणीही पक्ष सोडणार नाही. भाजप एकसंध आहे आणि राहील, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

Need for society to change : CP

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

Nashik police always there to help women

NASHIK:

Police is always ready to ensure the safety of girls and women, but incidents like Hyderabad and Madhya Pradesh still happen, the society needs to change and respect women for such incidents to stop, stated Commissioner of Police Vishwas Nangare Patil while speaking to Deshdoot Times. There is a need to give proper gender and sex education to children during the stage of adolescence and need to teach them how to respect women, he added.
The country has been shocked following rape and murder incidents at Hyderabad and Madhya Pradesh. On the backdrop of this, Nagre Patil expressed his views regarding women safety.

He said, Nashik is a developing city and women and girls here feel secure. In case of any harassment, police is always ready to provide safety for women. Giving priority to the safety of women and girls, many projects have been conducted in the area falling under the police commisionerate. Nirbhaya squads have been mainly formed and action has been taken against hundreds of eve-teasers so far.

Police have traced out 500 black spots in the city, increasing vigil in such areas. Nirbhaya squads, as well as beat marshals, are regularly patrolling there. Women police personnel in Nirbhaya squad are taking action against eve-teasers in case of harassment. Besides this, Nirbhaya squads are regularly visiting schools and colleges and are creating awareness among the students. Toll-free number 1091 of Nirbhaya squad is in the list of quick response.

A women cell in the police commissionerate has been made active. After a complaint by women, police are taking immediate action. Help from expert psychologists is being taken to give mental support to women. In addition, such training has also been given to those officials and personnel working in the cell. Orders have been issued for police stations to take immediate note of complaints by women and girls and to address them, Nangre Patil informed.
Women and girls avoid to visit police station for fear of society and defamation, but eve-teasers take benefit of this. If the help of police is taken in time, next mishap can be averted, he cautioned.

“Amendments are being made in the laws being meant for the safety of girls and women. We are always ready to protect girls and women, but they should be trained for self-defence. They cannot fight with anybody after three days of training. Training how to rescue self from such condition can be given in short period. It is essential to give training like karate for a year. This should be a part of education”, Nangre Patil expressed.

Efforts to achieve coordination among all depts

Various government departments are working for the welfare of women. We are working incoordination with women and child welfare department, family courts, fast track courts and Commission for Women. This will help in providing help to women at one place.

There should be initiative in the family itself

The atmosphere in the family is playing an important role in the development of children during their adolescence. If a woman does not get respect at home, children tend to develop similar attitudes. If they are not given proper sexual education, they get false information through film, TV serial, social media and internet and involve in bad acts. To prevent this, it is the responsibility of parents and educational institutes to provide proper guidance and education to children.

Learn to say NO

Girls many times are lured by friends or unknown person. There is an attempt to trap girls through chatting on facebook, WhatsApp or emotional blackmail. Girls should identify the motive of the person and stop talking to such people and learn to say no. They can also seek help of the police who will help, protecting the identity of the girls and women, said Nangre Patil.

Video : समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज – आयुक्त नांगरे-पाटील

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । खंडू जगताप 

मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कायम तत्पर आहेतच, परंतु पुरुषी मानसिकता बदलत नाही, समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हैदराबाद, मध्यप्रदेशसारख्या घटना होतच राहतील. वयात येताना मुलांना योग्य प्रकारे लैंगिक प्रशिक्षण देऊन त्यांना महिलांचा आदर करण्याची शिकवण देणे गरजेचे असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.
हैदराबाद तसेच मध्यप्रदेश येथे घडलेल्या अत्याचार व खून प्रकरणांनी देश हादरला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व येथील महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना नांगरे-पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, नाशिक हे विकसीनशील शहर असून येथील महिला, मुली नक्कीच सुरक्षितता अनुभवतात. कोणत्याही घटकांकडून तुम्हाला त्रास होत असल्यास आपले माहेर समजून पोलीस ठाण्यात यावे.पोलीस आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असतील. नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. प्रामुख्याने निर्भया पथके अधिक सज्ज करण्यात आली असून शेकडो टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

शहरात 500 ब्लॅक स्पॉट शोधले असून या ठिकाणी निर्भया तसेच बीट मार्शलची नियमित गस्त चालू आहे. निर्भया पथकातील पोलीस महिला साध्या वेशात अशा भागात जाऊन टवाळखोरांकडून त्रास होताच गुप्त चित्रिकरण करून त्यांना धडा शिकवत आहेत. याशिवाय शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन दररोज निर्भया पथके मुलांची जनजागृती करत आहेत. निर्भयाचा टोल फ्री क्रमांक 1091 हा सर्वाधिक जलद प्रतिसाद या यादीत आहे. अवघ्या काही मिनिटांत महिलांना आहे त्या ठिकाणी मदत दिली जात आहे.

आयुक्तालयातील महिला कक्ष सक्षम करण्यात आला असून महिलांची तक्रार येताच याची दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जात आहे. यासह महिलांना मानसिक आधार देण्यासाठी या कक्षात व्यावसायिक तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतो, यासह येथील अधिकारी व सेवकांना तसे प्रशिक्षण दिले गेले आहे. यासह त्या त्या भागातील पोलीस ठाण्यांमध्ये महिला व मुलींच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाईचे आदेश दिलेले आहेत.

मुली व महिला बदनामी व समाजाच्या भितीने पोलीस ठाण्यात येण्याचे टाळतात. परंतु याचा गैरफायदा टवाळखोर घेऊन पुढचे पाऊल उचलतात यामुळे पहिल्यांदाच पोलिसांची मदत घेतली तर पुढील अनर्थ टाळता येतील.

स्वरक्षणासाठी सज्ज व्हा

मुली व महिलांसाठी कायद्यांमध्ये मोठे बदल होत आहेत. पोलीस म्हणून आम्ही मुलींच्या सुरक्षेसाठी कायम तत्पर आहोतच, परंतु स्वरक्षण, बचावासाठी त्यांना तयार केले पाहिजे. मुलींना तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्या कोणाचा मुकाबला करू शकणार नाहीत. या तीन दिवसांत अशा प्रसंगातून सुटका करून घेण्याचे प्रशिक्षण देता येईल. तर मार्शल आर्ट, कराटेसारखे स्वरक्षणाचे वर्षभराचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. हा सर्व शिक्षणाचा भाग व्हावा असे नांगरे पाटील यांनी नमुद केले.

सर्व विभागांच्या समन्वयाचा प्रयत्न

शासनाचे विविध विभाग महिलांसाठी कार्य करत असतात. यामध्ये पोलिसांसह, महिला कक्ष, महिला व बालकल्याण विभाग, कौटुंबिक न्यायालये, शीघ्रगती न्यायालये, महिला आयोग असे महिलांसाठी काम करणार्‍या सर्व विभागांचा समन्वय करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जेणेकरून महिलांना सर्व मदत एकाच ठिकाणी व वेळेवर मिळेल.

कुटुंबांपासून प्रारंभ व्हावा

मुले वयात येताना त्यांच्यावर घरातील वातावरणाचा प्रभाव पडत असतो. पालक कसे वागतात. महिलेला घरात कसे वागवले जाते, त्यांचा आदर केला जात नसेल तर मुले बाहेरील महिलांबाबतही वाईट कमेंट पास करण्यास सुरुवात करतात. त्यांना वेळीच लैंगिक शिक्षण दिले गेले नाही तर चित्रपट, मालिका, सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून मिळणार्‍या चुकीच्या माहितीच्या आहारी जाऊन नको ती कृत्य करतात. यासाठी वयात येणार्‍या मुलांना वेळीच योग्य मार्गदर्शन, शिक्षण देण्याची जबाबदारी पालक तसेच शिक्षण संस्थांची आहे. कुटुंबापासूनच याची सुरुवात झाल्यास त्यांची मानसिकता बदलेल.

वेळीच नाही म्हणायला शिका

मुली अनेकदा मित्रांमध्ये अगर अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यास बळी पडतात. सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर चॅटिंग गोड बोलून अगर, ईमोश्नल ब्लॅकमेल करून, जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. पुढील व्यक्तीचा हेतू ओळखून पहिले बोलणे बंद करा. दुसरे वेळीच नाही म्हणायला शिका, याचा परिणाम नाही झाला तर कसलीही भीती न बाळगता पोलिसांकडे जाऊन तक्रार करायला शिका. पोलीस आपली बदनामी न होऊ देता मदत करतील व पुढील अनर्थ टळतील.