नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटीत मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांना निवडून निवडून मारले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून बचावलेल्या प्रत्यदर्शींकडून या घटनेचे थराररक अनुभव सांगितले. दरम्यान, दहशतवाद्यांनी कशाप्रकारे पर्यटकांना लक्ष्य केले, याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत दहशतवादी पर्यटकांवर गोळ्या झाडताना दिसत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळावरुन बचावलेल्या पर्यटकांचे व्हिडिओ समोर येत होते. यात एक महिला रडत रडत बोलताना दिसत आहे. तर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक दहशतवाद्याच्या हातात ऑटोमॅटिक गन आहे आणि पहलगाम येथील मैदानात पर्यटकांवर गोळीबार करताना दिसत आहे. या दहशतवाद्याने बॉडिकॅम परिधान केले होते. हल्लेखोराने या संपूर्ण हल्ल्याची व्हिडिओग्राफी केली होती. दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुषांना वेगवेगळे केले आणि त्यानंतर फक्त पुरुषांवर गोळ्या चालवल्या. काही लोकांना जवळून गोळ्या मारण्यात आल्या तर काहींना लांबून गोळ्या झाडण्यात आल्या.
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी महिला पुरुषांना वेगळे करत केला गोळीबार; पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक थरारक व्हिडीओ आला समोर#PahalgamTerroristAttack #viralvideo #shootingvideo #Baisaran pic.twitter.com/rdz2lEikbw
— Deshdoot (@deshdoot) April 24, 2025
हल्ल्यातून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी अचानक आले आणि त्यांनी लोकांना वेगवेगळे केले. धर्म विचारून दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांनावरच गोळ्या झाडल्या. दहशतवाद्यांनी कशा पद्धतीने पर्यटकांची हत्या केली याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
द रेझिस्टन्स फ्रंटच्या दहशतवाद्यांनी बैसरन घाटीत फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर निवडून निवडून गोळ्या झाडल्या. यात तब्बल २६ नागरिक मारले गेले. यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा समावेश आहे.
दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी काही पर्यटक जीव वाचवण्यासाठी धावले. लांब जाऊन काहींनी ही घटना बघितली. एका पर्यटकांने व्हिडीओ शूट केला आहे. ज्यात खाली काही पर्यटक बसलेले आहेत आणि दहशतवादी त्यांच्यावर गोळ्या झाडत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा