Thursday, April 24, 2025
Homeनगरपहेलगामचा अतिरेकी हल्ला मानवतेला काळीमा फासणारा - बाळासाहेब थोरात

पहेलगामचा अतिरेकी हल्ला मानवतेला काळीमा फासणारा – बाळासाहेब थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

काश्मीर खोर्‍यातील पहेलगाम येथे भारतीय नागरिकांवर झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारा असल्याची भावना माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. काश्मीर खोर्‍यातील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, पहेलगाम येथे झालेला हल्ला हा अत्यंत भ्याड व निंदनीय आहे. यामध्ये निष्पाप 27 भारतीयांचा अतिरेक्यांनी जीव घेतला आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. याबाबत सरकारने ठोस उपाययोजना केल्या पाहिजे.

- Advertisement -

केंद्र सरकारने कलमामध्ये बदल केला. 370 कलम लागू केले यावेळेस सांगितले वेगळे मात्र वस्तूस्थिती वेगळी आहे. अतिरेकी हल्ला आणि देशाची सुरक्षितता याबाबत सरकारने जास्त जागरूक राहण्याची आवश्यकता होती आणि यापुढे राहील अशी अपेक्षा व्यक्त करताना पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. माजी आ. डॉ.तांबे म्हणाले, काश्मीर खोरे हे देशाचे नंदनवन आहे. दरवर्षी हजारो पर्यटक तेथे जातात.

मात्र जातीय द्वेष पसरवण्यासाठी काही संघटना अतिरेकी हल्ले करतात यातून निरपराध नागरिकांचा बळी जातो. काश्मीरमध्ये 27 नागरिकांचा विनाकारण बळी गेला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मानवतेसाठी कलंक असल्याची प्रतिक्रिया जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे. पहेलगाम येथे मृत पावलेल्या 27 भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सीना नदी पात्रासह जलस्त्रोतांची स्वच्छता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून राज्य शासनामार्फत 1 मे पर्यंत आराधना वसुंधरेची हे अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातही शनिवारी...