Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPahalgam Terror Attack: दहशतवाद्यांना शोधा आणि मारा, डोकं फोडा, रक्त, मांस बाहेर...

Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांना शोधा आणि मारा, डोकं फोडा, रक्त, मांस बाहेर काढा; संतोष जगदाळेंच्या पत्नीची शरद पवारांकडे मागणी

पुणे | Pune
काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. त्यापैकी पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात आणण्यात आले. पुण्यातील दोघांच्याही निवासस्थांनी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दोघांच्याही पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शोकाकुळ वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

- Advertisement -

शरद पवार हे संतोष जगदाळे यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या कर्वे नगरमधील घरी गेले. त्यावेळी शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नीने बैसरन व्हॅलीत दहशतवादी हल्ल्यावेळी घडलेला प्रकार शरद पवार यांना सांगितला. यावेळी संतोष जगदाळे यांनी हल्ल्यादरम्यानचा प्रसंग सांगतांना एकच टाहो फोडला.

संतोष जगदाळेंच्या पत्नीने शरद पवारांना हल्ल्यादरम्यान सर्वांची काय अवस्था होती हे सांगितले. हा सर्व थरार सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या की, ‘त्यांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यात गोळ्या मारल्या. त्याने काहीही न विचारता थेट गोळ्या झाडल्या. ते सर्वजण तोंडाला मास्क लावून आले होते. दहशतवाद्यांनी प्रतिकार करणाऱ्या घोडेवाल्यालाही मारले. तो पर्यटकांना मारु नका, असे सांगत होता. दहशतवाद्यांनी तोंडावर मास्क घातले होते. लोकांचे जीव धोक्यात घालणे, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणे थांबले पाहिजे. आज माझा नवरा माझ्यासोबत नाही. आमचा माणूस आमच्या डोळ्यांदेखत गेला. तिथूनची स्थानिक लोकं आणि लष्कराचे अधिकारीही आमच्यासाठी रडत होते, असे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांना सांगितले.

तसेच, ‘त्यांनी जसे गोळ्या झाडून २७ जणांचा जीव घेतला. त्यांना देखील तशाच गोळ्या घाला. लोकांची दुर्दशा झाली. काही तरी बंदोबस्त केला. २७ लोकांना त्यांनी मारले. २७ कुटुंबांना उद्धवस्त केले. माझे आख्खे आयुष्य उद्धवस्त झाले. माझ्या नवऱ्याला मी बघूही शकत नाही. तिथेही त्यांनी माझ्या नवऱ्याचे तोंड दाखवले नाही. दहशतवाद्यांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यात गोळी घातली. आमच्यासाठी काहीतरी करा. त्या दहशतवाद्यांना शोधा आणि मारा. दहशतवाद्यांनी आमच्या लोकांच्या डोक्यात गोळी घालून मांस बाहेर काढले, रक्त काढले, तसेच त्यांच्यासोबत करा आणि दहशतवाद्यांचे मृतदेह आम्हाला दाखवा. दहशतवाद्यांनी लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घातल्या. तेव्हा लहान मुले रडत होती. तिकडून खाली उतरताना आम्ही चिखलात पडलो. त्यामुळे मला पायांवर उभेही राहता येत नाही, असे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांना सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...