Friday, January 23, 2026
Homeदेश विदेशPahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी...

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी दोन जणांना अटक

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दोन महिन्यांपूर्वी २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांची धार्मिक ओळख पटवून त्यांची हत्या केली होती. या हल्ल्यात २६ पर्यटक मृत्यूमुखी पडले. त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. मात्र पहलगाममध्ये हल्ला करणारे चार दहशतवादी मात्र सुरक्षा दलांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान ठाकले आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनआयएच्या हाती मोठे यश लागले असून, पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएने रविवारी दोन जणांना अटक केली आहे.

एनआयएने या संदर्भात एक निवेदन जारी केले असून अटक करण्यात आलेले आरोपी पहलगामच्या बटकोट येथील आहेत. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी देशासोबत गद्दारी केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर दहशतवाद्यांना मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पहलगाम येथील हिल पार्क येथील बशीर अहमद जोथर याने हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे आणि ते बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी केली आहे. या दोघांनी हल्ल्यापूर्वी आतंकवाद्यांना अन्न, निवारा आणि इतर लॉजिस्टिक सुविधा पुरवल्या होत्या, असे तपासातून समोर आले आहे. तसेच, बैसरन खोऱ्यात जम्मू-काश्मीर पोलिस किंवा सीआरपीएफची कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याची माहितीही त्यांनी दहशतवाद्यांना दिली होती. एवढेच नव्हे तर सुरक्षादलाची दिशाभुल करण्यासाठी त्यांची ओळखही लपवली होती.

- Advertisement -

या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून हत्या केली. या हल्ल्यात फक्त पुरुषांनाच मारले होते. एनआयएने या दोघांना बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, १९६७ च्या कलम १९ अंतर्गत अटक केली आहे. एनआयएने सांगितले की, या दोन्ही आरोपींना लवकरच न्यायालयात हजर करून त्यांची रिमांड मागितली जाईल.

YouTube video player

दरम्यान, पहलगाममध्ये २६ जणांचा जीव घेणारे तीन दहशतवादी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना पकडण्यात एनआयएला यश आले आहे. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

महाड

मोठी बातमी! महाड राड्याप्रकरणी विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर शरण, अटकपूर्व जामीनावर...

0
मुंबई | Mumbaiरायगड जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मंत्री आणि शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी अखेर...