Tuesday, March 25, 2025
Homeनगरहजारो भाविकांनी घेतले पैस खांबाचे दर्शन

हजारो भाविकांनी घेतले पैस खांबाचे दर्शन

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरामध्ये मंगळवारी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी शेकडो दिंड्यांनी येथे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा गजर करत हजेरी लावली. माऊलींच्या जयघोषाने नेवासेनगरी दुमदुमली होती. कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे देविदास महाराज म्हस्के यांच्या उपस्थितीत मंदिर विश्वस्त कृष्णा पिसोटे व गुंफाताई पिसोटे यांच्या हस्ते पैस खांबास अभिषेक करण्यात आला. यावेळी विश्वस्त ज्ञानेश्वर शिंदे, कैलास जाधव, रामभाऊ जगताप, भिकाजी जंगले, भैय्या कावरे, सेवेकरी शिवाजी होन यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

मंदिर प्रांगणाच्या बाहेर यात्रा भरली होती. मुख्य दर्शन बारीसह मंदिर प्रवेशद्वारापासून मुख दर्शनासाठी बारी तयार करण्यात आली होती. पायी आलेल्या व दिंडीतील चालकांचा श्रीफळ प्रसाद देऊन विश्वस्त मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी देविदास महाराज म्हस्के म्हणाले, कार्तिक वद्य एकादशी ही माऊलींची धाकटी एकादशी असल्याने नेवासा तालुक्यातून शेकडो दिंड्या येथे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करत दर्शनासाठी हजेरी लावतात. टाळ-मृदुंगाच्या गजरात रिंगण सादर करतात. माऊलींच्या कर्मभूमीमध्ये गेल्या चार महिन्यांपासून आपण आळंदीच्या धर्तीवर ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवींवर दररोज प्रवचन निरूपण सुरू केले असून दररोज पहाटे माऊली भक्तांच्या हस्ते पैस खांबास अभिषेक उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमासाठी नावनोंदणी करून सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी आलेल्या भाविकांनी मंदिरातील विठ्ठल रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली, भगवान दत्तात्रय, श्री. करविरेश्वर, वै. बन्सी महाराज तांबे समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिर प्रांगणाच्या बाहेर विविध दुकाने थाटण्यात आल्याने एकादशीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...