नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प यांनी असिम मुनीर यांच्याबरोबर भोजन देखील केले. या भेट दरम्यान त्यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जाते. या भेटीनंतर असिम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव लगेचच २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवले आहे. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ट्रम्प यांच्या राजनैतिक पुढाकार आणि मध्यस्थीमुळे मोठे युद्ध टाळण्यास मदत झाली, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
गेल्या महिन्यात भारत-पाकिस्तान दरम्यान संघर्ष पेटला होता, त्यावेळेस दोन्ही देशांदरम्यान युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळं, विमानतळांवर हल्ले केले ज्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. भारत-पाकिस्तानमधील संघर्ष रोखण्याचे श्रेय पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना देत त्या कारणास्तव ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे.
निवेदनात काय म्हंटले?
पाकिस्तानने एका औपचारिक निवेदनात डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीसाठी महत्त्वपूर्ण हस्तक्षेप केल्याचे सांगत संकटादरम्यान त्यांच्या निर्णायक राजनैतिक सहभाग आणि निर्णायक नेतृत्वाचे कौतुक केले. तसेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्त्वाच्या क्षणी पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांशी संवाद साधून उत्तम धोरणात्मक दूरदृष्टी दाखवली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे शस्त्रसंधी झाली, ज्यामुळे एक विनाशकारी संघर्ष टळला, असे पाकिस्तानने एका औपचारिक निवेदनात म्हटले आहे.
ट्रम्प यांची पोस्ट
ट्रम्प यांनी शुक्रवारी ‘ट्रुथ सोशल’ वर पोस्ट करत लिहिले की, “मी काहीही केले तरी मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही. मी, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासोबत, कांगो-रवांडा युद्ध थांबवण्यासाठी शांतता करारात मध्यस्थी केली. हा एक रक्तरंजित संघर्ष होता जो अनेक दशकांपासून सुरू होता.” मुनीर यांनी यापूर्वी ट्रम्प यांना नोबेल देण्याची मागणी देखील केली होती. यापूर्वी ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये बंद खोलीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची भेट घेतली होती. दोघांनीही व्हाईट हाऊसच्या कॅबिनेट रूममध्ये एकत्र जेवण केले. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे आदरातिथ्य करण्याची ही पहिलीच वेळ होती.
https://truthsocial.com/@realDonaldTrump/114717932061341718/embed
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




