Saturday, September 21, 2024
Homeदेश विदेशपाकिस्तानात अंधारच अंधार! खाण्यासोबत विजेचेही वांदे, मेट्रो, बाजारपेठा ठप्प

पाकिस्तानात अंधारच अंधार! खाण्यासोबत विजेचेही वांदे, मेट्रो, बाजारपेठा ठप्प

दिल्ली | Delhi

- Advertisement -

महागाईमुळे बेहाल झालेल्या पाकिस्तानात आता बत्तीगुल झाली आहे. राजधानी इस्लामाबादबरोबरच लाहोर आणि कराचीमध्येही तासन्तास वीज खंडित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानमध्ये ऊर्जा संकट निर्माण झाले होते. सरकारने जनतेला सत्ता वाचवण्याची विनंतीही केली होती.

पाकिस्तानात आधीच वीजेचा अपुरा पुरवठा होतोय. तिथे सर्वाधिक काळ लोडशेडिंग असते. म्हणून सरकारने आठ वाजताच वीजसेवा बंद ठेवण्याचे आदेश पाकिस्तानातील विविध बाजारांतील व्यावसायिकांना दिले आहेत. दरम्यान, आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अद्यापही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी ७:३४ वाजता राष्ट्रीय ग्रीडची सिस्टम फ्रिक्वेन्सी कमी झाली, ज्यामुळे वीज यंत्रणेत मोठा बिघाड झाला आहे. यंत्रणा देखभालीचे काम वेगाने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटा आणि गुड्डू दरम्यानच्या हाय-टेंशन ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळे देशाच्या विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. पाकिस्तानला आधीच वीज टंचाई आणि वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. असे पाकिस्तान सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे.

कडाक्याची थंडी…आसपास कोणीही नाही अन् तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या…मग…

दरम्यान, वीज नसल्यामुळे सोशल मीडियावर लोकांच्या संतापाचा भडका उडला आहे. अनेक तासांपासून वीज लाईन ठप्प आहे. गुड्डू, जामशोरो, मुझफ्फरगड, हवेली शाह बहादूर, बलोकी येथील पॉवर प्लांटमध्ये वीज बिघाड झाल्यामुळे वीज गेल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

लाहोरमध्ये, मॉल रोड, कॅनाल रोल्ड आणि इतर भागातील ग्राहकांना वीज पुरवठ्यात व्यत्यय येत आहे, तर ऑरेंज लाइन मेट्रो ट्रेन सेवा देखील बंद करण्यात आली आहे.

पाकिस्तानात जीवनावश्यक वस्तुंची वाणवा असताना तिथे वीजेचीही कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या नॅशनल इलेक्ट्रिक पॉवर रेग्युलेटरी ऑथोरिटीने कराची शहरांतील वीजदरांत ३.३० रुपये प्रति युनिट वाढ केली आहे. तसंच, विविध ग्राहक विभागानुसार वीजदरांत १.४९ रुपयांपासून ते ४.४६ रुपयांनी प्रति युनिट वाढ केली आहे.

शेतात पाणी द्यायला गेले अन् समोर दिसले बिबट्याचे बछडे; पुढे असं घडलं की…

भारतापेक्षा चौपट वीजबिल पाकिस्तानातून आकारले जाते. भारतात प्रति युनिट ६ ते ९ रुपये वीज मिळते. तर व्यावसायिक वापरासाठी १० ते २० रुपये प्रति युनिट वीज मिळते. यामुळे भारतापेक्षा अधिक वीजदर आकारूनही वीजसेवेत खंड पडत नसल्याने वीजपुरवठ्याचे संकट गडद होत आहे.

एकास बेडी घालून मारहाण; उलट सुलट चर्चेला उधाण बस दरीत कोसळून भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

- Advertisment -

ताज्या बातम्या