दिल्ली Delhi
पाकिस्तान कडून पुन्हा अवघ्या चार तासानंतर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर राजौरी, उधमपूर, या भागात गोळीबार सुरु केला केला होता. दरम्यान श्रीनगरमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज येत होते . दरम्यान भारतीय लष्काराकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आल्या नंतर ड्रोन हल्ले परतवून लावले . त्या नंतर परराष्ट्रीय मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन विशेष माहिती दिली आहे.
पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहेत, पाकिस्तान कडून गोळीबार केला जात आहे.,पाकिस्तानने स्थिती समजवून घ्यावी, पाकच्या हालचाली वर भारतीय सैन्याचे पूर्ण लक्ष असून पाकिस्तान सरकारने हल्ले तत्काळ थांबवाविण्यासाठी ठोस पावले उचलावेत असे आवाहन केले आहे.
दरम्यान भारतीय लष्कराने या परिस्थितीवर सैन्याने कडक नजर ठेवावी, पाकिस्तान कडून शस्त्र संधीचे उल्लंघन झाल्यास भारतीय सेनेने पाकिस्तानला चोख उत्तर देण्यात यावे असे परराष्ट्रीय मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांचे कडून सांगण्यात आले आहे.