लासलगाव। वार्ताहर Lasalgaon
पालखेड डावा कालव्याचे सिंचनाचे दुसरे आवर्तन उद्यापासून (दि.7) सोडण्यात येणार असल्याने पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- Advertisement -
पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील सिंचनासाठी दुसरे आवर्तन (दि.15) मार्च 2025 पासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र पालखेड लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकर्यांची पिके पाण्याअभावी सुकायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली होती.
त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार आजपासून कालव्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.