Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik News : पळसनचे शिक्षक चौधरी व विद्यार्थिनी पवार दिल्ली येथील सोहळ्यासाठी...

Nashik News : पळसनचे शिक्षक चौधरी व विद्यार्थिनी पवार दिल्ली येथील सोहळ्यासाठी पोहोचले

ठाणगाव | वार्ताहर | Thangaon

७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून दिल्लीतील (Delhi) लालकिल्ला येथे उपस्थित राहण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सुरगाणा तालुक्यातील पीएम श्री ठरलेल्या पळसन येथील जिल्हा परिषदेचे शाळेचे शिक्षक विठ्ठल नारायण चौधरी व कु. अश्विनी भगवान पवार यांची निवड करण्यात आली. त्यांना याबाबतचे अधिकृत पत्र शिक्षण विभागाकडून मिळाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात पावसाची उघडझाप; गंगापूर धरणातील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर

देशातील विविध राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील (Revenue Department) पीएम श्री निवड झालेल्या शाळांमधील एक शिक्षक व एक विद्यार्थी या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातून (Maharashtra) पीएम स्कूलचे ६ शिक्षक व ६ विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहेत. यात या शिक्षक व विद्यार्थीनीचा समावेश आहे.

हे देखील वाचा : नाशिक कृउबा समितीच्या उपसभापतीपदी माळेकर बिनविरोध

दरम्यान, सोमवारी सायंकाळी साडेसहाला नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून (Nashik Road Railway Station) राजधानी एक्सप्रेसने ते दिल्ली येथे पोहोचले आहेत. त्यांना शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व विद्यार्थ्यांकडून प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

यंदाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आम्हाला दिल्लीला पीएम श्री शाळेच्या माध्यमातून निवड करून आमंत्रित केल्यामुळे मी केंद्रीय व राज्य शिक्षण मंत्रालयाचे तसेच जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभागाचे खूप खूप आभार मानतो. तसेच पीएम श्री शाळेच्या माध्यमातून माझी पळसन शाळा सर्वगुण संपन्न बनविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली.

विठ्ठल चौधरी, शिक्षक, पळसन

मी कधी दिल्लीला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी किंवा दिल्ली पाहण्यासाठी जाईन हे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. पंरतु, पीएम श्री शाळेच्या माध्यमातून माझ्या शाळेची, आमच्या शिक्षकांची व माझी निवड झाल्यामुळे मी खूप आनंदीत आहे. याठिकाणी येऊन भारत देशातील प्रत्येक राज्यातील व्यक्तींसोबत मिसळून त्यांच्या भाषा व विचार जाणून घ्यायला मिळाले.

कु. अश्विनी पवार, विद्यार्थिनी, पळसन

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या